Chandrapur crime news: बाप रे! संपत्तीसाठी सख्या बहिणीचा गळा चिरला, आईवरही वार; चंद्रपूर हादरलं!

brother kills sister: संपत्तीच्या वादातून एका सख्या भावाने आपल्या ३२ वर्षीय बहिणीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Chandrapur crime news
Chandrapur crime newsfile photo
Published on
Updated on

Chandrapur crime news

चंद्रपूर: संपत्तीच्या वादातून एका सख्या भावाने आपल्या ३२ वर्षीय बहिणीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या रक्तरंजित हल्ल्यात आई देखील गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

Chandrapur crime news
Nagpur Crime News : नात्याला काळिमा !मोबाईलवेड्या वासनांध भावाने बहिणीवर केला अत्याचार; पोलिसांत गुन्हा दाखल

नेमकी घटना काय?

भद्रावती येथील रहिवासी सूरज शंकर भोंडे (२८) याचे बहीण संजीवनी शंकर भोंडे (३२) आणि आई पुष्पा शंकर भोंडे (५८) यांच्याशी गेल्या काही दिवसांपासून संपत्तीवरून वाद सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, घरात गेल्या ३-४ दिवसांपासून सतत कडाक्याचे भांडण होत होते. या वादामुळे मृत संजीवनी आणि तिची आई पुष्पा या दोघी वेगळ्या राहत होत्या, तर आरोपी सूरज आणि त्याचे वडील वेगळे राहत होते.

बुधवारी वादाने रौद्र रूप धारण केले आणि संतापलेल्या सूरजने संजीवनीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यात संजीवनीचा जागीच मृत्यू झाला. मुलीला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या आईवरही सूरजने हल्ला केला, ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सूरज भोंडे याला अटक केली असून, त्याच्या वडिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Chandrapur crime news
Crime News : भावाच्या परस्पर बहिणींनी दीड कोटीची संपत्ती लाटली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news