Men's Mental Health | पुरुष मानसोपचारतज्ज्ञांकडे का जात नाहीत? ८ समज ठरतात कारणीभूत

Men's Mental Health | भावना व्‍यक्‍त करणे लज्‍जास्‍पद गोष्‍ट असल्‍याचे पुरुषांच्‍या मनावर लहानपणापासून बिंबवले जाते
AI-generated image
प्रातिनिधिक छायाचित्र.Pudhari
Published on
Updated on

Men’s Mental Health: 8 Reasons Why Men Avoid Therapy

नवी दिल्‍ली : "किती बडबडतोस मुलींसारखं.... रडायला तू मुलगी आहेत का ?... बाईसारखं काय घाबरतोस का?," अशी वाक्‍य आपल्‍या समाजात प्रत्‍येक पुरुष हा बालपणापासूनच ऐकत असतो. वास्‍तविक अशा भाषेतून महिलांना कमी लेखलं जातच त्‍याचबरोबर मोकळेपणाने भावना व्‍यक्‍त करणे किंवा रडणे हे पुरुषार्थाला काळिमा फासणारे आहे, असे लहानपणापासूनच पुरुषांच्‍या मनावर बिंबवलं जातं. याचा मोठा परिणाम त्‍यांच्‍या मानसिक आरोग्‍यावर होत असतो. hhय लागलेले पुरुष मानसिक उपचारासाठी जात नाहीत. यामागील आठ कारण आपल्‍या आजवरच्‍या अनुभवांवर शेअर केली आहेत क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ डॉ. स्टीफन ब्लुमेंथल यांनी. जाणून घेवूया या आठ कारणांविषयी....

पुरुषांची भूमिका ही नेहमीच शब्दांपेक्षा कृतीवर आधारित असते

क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ डॉ. स्टीफन ब्लुमेंथल हे पुरुष मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्‍याच्‍या का टाळतात हे सांगताना स्‍पष्‍ट करतात की, प्राचीन काळापासून पुरुषांची भूमिका काम आणि उदरनिर्वाहावर केंद्रित होती तर स्त्रियांची भूमिका काळजी घेण्यावर होती. आजही, पुरुष अधिक बोलण्‍यापेक्षा कृतीसाठी तयार असतात. हे अंशतः जन्मजात असते: मुले शाब्दिक आणि भावनिक जुळवून घेण्याच्या बाबतीत मुलींपेक्षा मागे असतात. जेव्‍हा दुःख व्यक्त करण्‍याचा विषय असतो तेव्‍हा स्त्रिया सरासरी एका दिवसात जास्त शब्द बोलतात. पुरुषांना दुःख शब्‍दांमध्‍ये मांडणे हे अधिक कठीण वाटते. संशोधनातून असे दिसून आले आहे की, पुरुष हे स्‍वत :ला निराश किंवा चिंताग्रस्त असल्याचे सांगण्याची शक्यता खूपच कमी असते; त्याऐवजी, त्रास झाल्यावर ते चिडचिड किंवा कृतीद्वारे तो व्यक्त करतात.

AI-generated image
Social Media impact on children | समाजमाध्यमांच्या विळख्यातील बालपण

२. पुरुषांना सहसा 'ग्रुप थेरपी' अधिक आवडते

संवादातून केल्या जाणाऱ्या उपचारांसाठी महिला अधिक प्रमाणात पुढाकार घेतात. परिणामी, या सेवा बहुधा महिलांच्‍या दृष्टिकोनातून विकसित केल्या जातात. येथे थेट भावनांवर बोलण्यावर भर दिला जातो. हे पुरुषांसाठी गैरसोयीचे ठरू शकते. ब्लुमेंथल म्हणतात की, पुरुषांना सहसा 'ग्रुप थेरपी' अधिक आवडते, कारण तिथे त्यांना एक प्रकारचा मोकळेपणा आणि समान अनुभवांची जाणीव मिळते. केंद्रस्थानी न राहताही ते लोकांशी जोडू शकतात. सुरुवातीला त्यांच्या कामाच्या वातावरणाबद्दल ते सोयीस्करपणे बोलू शकतात. चर्चा केल्यास, हळूहळू ते अधिक वैयक्तिक संघर्षांबद्दल बोलू लागतात.

AI-generated image
Obesity Health Alert | सावधान! लठ्ठपणा केवळ 'लाईफस्टाईल' नाही, तर एक 'जुनाट आजार'! डायबेटीजतज्ज्ञ कोणते धोके सांगतात?

३. स्वतःची कमजोरी दाखवणे जोखमीचे वाटते

नेहमी प्रयत्नशील राहण्याची आणि जिंकण्याची वृत्ती पुरुषांमध्ये खोलवर रुजलेली असते. हाच विचार त्‍यांना मानसिक त्रासाच्या वेळी मदत घेण्यापासून रोखते. आपण मानसिक हळवेपणा दाखवल्यास इतरांच्या नजरेत आपला दर्जा कमी होईल, अशी भीती त्यांना वाटते. लहानपणापासूनच्‍या संगोपनातूनच त्‍यांच्‍या मनात असे विचार येतात. त्यांना भावना व्यक्त करण्यास प्रोत्साहन देणारी थेरपी धोकादायक वाटू शकते. सुरक्षित वातावरण पुरुषांना त्यांच्या मर्यादा घालणाऱ्या वागण्याच्या पद्धतींकडे पाहण्यास आणि त्या सोडून देण्यास मदत करते.

AI-generated image
Momos Side Effects: बापरे! मोमोज खाल्ल्याने १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल; स्मरणशक्ती गमावली, नेमकं काय घडलं?

४. "एकला चलो रे" ही मानसिकता

१९ व्या शतकातील एकाकी साहसी नायकांच्या कादंबऱ्यांपासून ते आधुनिक काळातील 'सिग्मा मेल' ( स्‍वबळाचे अभिमान असणार्‍या पुरुषांचे उदात्तीकरण करणारी ऑनलाइन संस्कृती) पर्यंत, पुरुषाने एकट्यानेच झुंज दिली पाहिजे, हा वारसा आजही कायम आहे. चांगल्या आयुष्यासाठी मजबूत आणि अर्थपूर्ण नातेसंबंध ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तरीही, एकाकी आणि स्वावलंबी राहण्यातच सुरक्षितता आहे, या हानिकारक कल्पनेतून बाहेर पडणे पुरुषांना कठीण जाते.

AI-generated image
Mobile use in toilet risks | टॉयलेटमध्ये मोबाईल वापरताय? गंभीर आजारांचा संभवतो धोका

५. तीव्र भावनांचे प्रदर्शन सहन करणे अनेकदा कठीण

ब्लुमेंटल यांच्या मते, पुरुषांसाठी तीव्र भावनांचे प्रदर्शन सहन करणे अनेकदा कठीण असते. समस्यांकडे यांत्रिक पद्धतीने पाहण्याचे संस्कार त्यांच्यावर झालेले असतात: 'समस्या ओळखा, कृती करा आणि सोडवा'. तांत्रिक किंवा व्यावहारिक समस्यांच्या वेळी हे ठीक आहे, पण भावनिक प्रश्नांच्या बाबतीत ते अडकून पडतात. थेरपीसाठी संयम आणि अनिश्चितता स्वीकारावी लागते, ही बाब पुरुषांच्या पारंपारिक चौकटीत बसत नाही.

AI-generated image
International Women’s Day | भात आणि लठ्ठपणा; आधुनिक जीवनशैलीत भारतीय महिलांनी आरोग्याचा समतोल कसा साधावा?

६. पुरुषांना असते त्‍वरित निकालाची अपेक्षा

एकूणच पुरुषांमध्ये संयम कमी असतो. त्यांना त्वरित निकालाची अपेक्षा असते. परिणामी, मदतीसाठी पुढाकार घेण्याची त्यांची मर्यादा जास्त असते; जोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जात नाही, तोपर्यंत ते मदतीसाठी जात नाहीत. एखादी समस्या आधी सोडवता आली असती, ती नंतर अक्राळविक्राळ रूप धारण करते. तुम्ही मदतीसाठी द्विधा मनःस्थितीत असाल, तर हे लक्षात ठेवा की मदत घेण्यासाठी तुम्हाला संकटाच्या टोकापर्यंत पोहोचण्याची गरज नाही.

AI-generated image
Strange Diets No Roti No Rice: MBBS च्या विद्यार्थिनीनं १० वर्षे चपाती भात खाल्लाच नाही... आरोग्यावर काय झाला परिणाम?

७. आदर्श रोल मॉडेल्सची कमतरता

काही अपवाद वगळता, प्रसारमाध्यमांमध्ये पुरुषांच्या थेरपीबद्दल तेव्हाच बोलले जाते जेव्हा ते मोठ्या संकटात असतात (उदा. व्यसनमुक्ती केंद्रात जाणे). थेरपीकडे अनेकदा केवळ वाईट परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणून पाहिले जाते. पुरुष अनेकदा त्वरित निकालाच्या अपेक्षेने थेरपीला येतात. त्यांना हे समजून घेणे आवश्यक असते की हे काही जादूचे औषध नाही, तर इथे बसून आपल्या हळव्या बाजूचा स्वीकार करणे आणि छोट्या, साध्या पावलांनी प्रगती करणे महत्त्वाचे आहे. आपण ज्याप्रमाणे जिम किंवा आहाराबद्दल बोलतो, तसे नियमित मानसिक आरोग्यासाठी थेरपी घेणाऱ्या पुरुषांबद्दल आपण क्वचितच ऐकतो.

AI-generated image
Strange Diets No Roti No Rice: MBBS च्या विद्यार्थिनीनं १० वर्षे चपाती भात खाल्लाच नाही... आरोग्यावर काय झाला परिणाम?

८. संपूर्ण आयुष्य विस्कटून जाण्‍याची भीती

थेरपी म्हणजे अशा गोष्टींचा सामना करणे ज्या आपण टाळू इच्छितो. यामुळे जुन्या वेदना, अपराधीपणा किंवा दुःख समोर येऊ शकते. "जर मी मनाच्या या धाग्यांना स्पर्श केला, तर कदाचित माझं संपूर्ण आयुष्य विस्कटून जाईल," ही भीती सर्वांनाच वाटते, पण पुरुषांमध्ये ती अधिक तीव्र असते. जर तुम्ही तुमच्या ओळखीच्या एखाद्या पुरुषाला पहिले पाऊल उचलण्यास मदत करत असाल, तर त्याला उपदेश किंवा सल्ला देण्याऐवजी साथ आणि समज द्या, कोणत्याही दडपणाशिवाय त्याला आधार देण्यावर भर द्या, असाही सल्‍ला डॉ. स्टीफन ब्लुमेंथल यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news