Strange Diets No Roti No Rice: MBBS च्या विद्यार्थिनीनं १० वर्षे चपाती भात खाल्लाच नाही... आरोग्यावर काय झाला परिणाम?

एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या ३४ वर्षाच्या आकृती गोयलनं आपला डाएट आणि त्याचा आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Strange Diets
Strange Diets pudhari photo
Published on
Updated on

MBBS Student Strange Diets No Roti No Rice: सध्या खान-पान आणि डाएटबाबत लोकांमध्ये चांगलीच जागरूकता निर्माण झाली आहे. त्यातच आता कोणता आहार आरोग्यासाठी चांगला आणि कोणता आहार वाईट याच्याबाबतच्या माहितीचा महापूर सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून आला आहे. त्यातच आता एका एमबीबीएसच्या विद्यार्थिनीचा एक विचित्र डाएट सध्या सोशल मीडियावर व्हारल होत आहे.

Strange Diets
Purandar Rice Mill Women Farmers: दक्षिण पुरंदरमध्ये महिला भात उत्पादकांची राईस मिल; पायाभरणीने नवे पर्व

एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या ३४ वर्षाच्या आकृती गोयलनं आपला डाएट आणि त्याचा आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात तिने गेल्या १० वर्षापासून तिनं चपाती आणि बात खाल्ला नसल्याचा दावा केला आहे. त्यानंतर तिचे आरोग्य आधीपेक्षा खूपच चांगलं झाल्याचा देखील तिने दावा केला आहे.

Strange Diets
Kids Weight Gain Diet | बाळाचे वजन वाढत नाही? पेडियाट्रिशियनच्या 5 डाइट टिप्स, झपाट्याने वाढेल वजन

असा आहे आकृतीचा डाएट

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आकृती गोयल म्हणते की, तिने जवळपास गेल्या १० वर्षापासून आपल्या डाएटमधून चपाती आणि भात हद्दपार केला आहे. ती क्वचितच कधीतरी चपाती किंवा भात खाते. ती सहसा तिच्या जेवणात चपाती किंवा भात नसतोच. ती गेल्या दोन वर्षापासून प्रत्येक जेवणात चपातीच्या जागी मुगाच्या डाळीचा किंवा दुसऱ्या डाळीचा चिला आणि बाजी खाते. त्यामुळे तिची ताकद टिकून राहते. तसेच पचनक्रिया देखील चांगली राहते.

याचबरोबर ती आठवड्यातील ५ दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग देखील करते. त्यामुळे ती दिवसभर खूप अॅक्टिव्ह राहते. तिची एनर्जी ही २० वर्षाच्या एबीबीएस विद्यार्थ्यापेक्षाही चांगली असते. आकृती म्हणते की ती गेल्या १० वर्षापासून सतत व्यायाम करते. ती जरी चपाती आणि भात खात नसली तरी तिला उर्जेची कमतरचा आहे असं कधी वाटत नाही.

Strange Diets
Akshaye Khanna Diet: १० तास झोपतो, डाएटही करत नाही तरी धुरंधर फेम अक्षय स्लीम कसा?

का खात नाही चपाती अन् भात?

आकृतीने आधी इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर तीने नीट परीक्षा देऊन वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. आकृतीने चपाती आणि भात न खाण्याचं कारण सांगितलं आहे. ती म्हणते की तिच्या घरात अनेक जण मधुमेहाचे पेशंट आहेत. आकृतीला तिला स्वतःला मधुमेह होऊ नये असं वाटतं.

आकृतीच्या मते भारतात मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या व्याधी वेगाने वाढत आहेत. याचं प्रमुख कारण म्हणजे तरूण वयात खाण्यापिण्याच्या सवयींबाबत असलेला निष्काळजीपणा असल्याचं तिच म्हणणं आहे. आकृतीच्या मते आपण ३० -४० वयापर्यंत आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यानंतर ५० आणि ६० व्या वयात मधुमेह आणि त्यासारखे आजार जडतात. जर योग्य वेळेत योग्य डाएट आणि लाईफस्टाईलचा स्वीकार केल्यानं या गंभीर आजारांपासून बचाव करता येतो.

Strange Diets
Glowing Skin : क्रीम आणि खर्चाशिवाय नैसर्गिकरित्या चमकदार त्वचेसाठी खास टिप्स

डाळीपासून तयार केलेली पोळी

आकृतीनं चपातीपेक्षा डाळीपासून तयार केलेली पोळी खाल्यानं जेवणानंतर आळस येत नाही. ती पोळी सहज पचते आणि गव्हाच्या तुलणेत त्यामध्ये जास्त प्रोटीन असतं. भातामध्ये प्रोटीन नसतं. डाळींच्या पोळीत गव्हात एवढे फायबर असतात आणि त्याचा ग्लाईसेमिक इंडेक्स देखील कमी असतो. त्यामुळे ब्लड शुगर वाढत नाही.

असं असलं तरी आकृती सर्वांना गव्हाची चपाती आणि भात पूर्णपणे सोडून देण्याचा सल्ला देत नाही. मात्र तुमच्या कुटुंबात मधुमेहाची हिस्ट्री असेल तर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं आकृती सांगते.

टीप - वरील बातमी फक्त माहितीकरिता देण्यात आली आहे. डाएटमधील कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news