Momos Side Effects: बापरे! मोमोज खाल्ल्याने १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल; स्मरणशक्ती गमावली, नेमकं काय घडलं?

मोमोजसारख्या फास्ट फूडच्या अतिसेवनाने एका १० वर्षांच्या मुलीला गंभीर आजाराने ग्रासल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Momos Side Effects
Momos Side Effectsfile photo
Published on
Updated on

Momos Side Effects

नवी दिल्ली: मोमोजसारख्या फास्ट फूडच्या अतिसेवनाने एका १० वर्षांच्या मुलीला गंभीर आजाराने ग्रासल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील बुराडी परिसरात उघडकीस आली आहे. या मुलीचे यकृत निकामी झाल्याने शरीरातील विषारी घटक मेंदूपर्यंत पोहोचले, ज्यामुळे तिची स्मरणशक्ती गेली आणि तिला चालणेही अशक्य झाले होते. अखेर 'प्लाज्माफेरेसिस' या उपचार पद्धतीमुळे या चिमुरडीचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

तान्या असे या १० वर्षीय मुलीचे नाव असून तिचे आई-वडील दोघेही नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असतात. शाळा सुटल्यानंतर तान्या आपल्या आजोबांकडून पैसे घेऊन दररोज बाहेरून मोमोज आणि चिप्स आणून खात असे. काही दिवसांनी तिला छोट्या-छोट्या गोष्टींचा विसर पडू लागला आणि सतत थकवा जाणवू लागला. हळूहळू तिची प्रकृती इतकी खालावली की तिला साधे उभे राहणेही कठीण झाले.

Momos Side Effects
Tobacco–Diabetes Link | व्यसन वडिलांचे, शिक्षा मुलांना..! जाणून घ्या तंबाखू आणि मुलांमधील मधुमेहाचा काय आहे संबंध?

लिव्हर निकामी झाल्याने मेंदूला सूज

तान्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती तिचे लिव्हर पूर्णपणे निकामी झाल्याचे समोर आले. शरीरातील विषारी घटकांचा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्याने मेंदूला सूज आली होती. सुरुवातीला डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता, जो अत्यंत खर्चिक आणि गुंतागुंतीचा होता.

नंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेऐवजी 'प्लाज्माफेरेसिस' तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेत शरीरातील दूषित प्लाज्मा काढून त्याऐवजी शुद्ध प्लाज्मा चढवला जातो. यामुळे लिव्हरला विश्रांती मिळते आणि ते पुन्हा कार्यक्षम होण्यास मदत होते. सध्या तान्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि तिचे प्राण वाचले.

डॉक्टर काय सांगतात?

बालरोगतज्ज्ञ डॉ. शैलेश शर्मा यांनी सांगितले की, "दिल्लीतील सुमारे ३५ टक्के मुलांमध्ये 'फॅटी लिव्हर'ची लक्षणे दिसून येत आहेत. फास्ट फूडचे अतिसेवन, व्यायामाचा अभाव आणि वाढता 'स्क्रीन टाइम' ही याची मुख्य कारणे आहेत."

तसेच गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. अपूर्व पांडे यांच्या मते, लोक दिवसाला आवश्यक तेवढे पाणी पीत नाहीत. मेटाबॉलिज्मसाठी दररोज किमान अडीच लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी कमी पिणे आणि फास्ट फूडचा अतिवापर यामुळे यकृताचे गंभीर आजार जडत आहेत.

Momos Side Effects
Obesity Health Alert | सावधान! लठ्ठपणा केवळ 'लाईफस्टाईल' नाही, तर एक 'जुनाट आजार'! डायबेटीजतज्ज्ञ कोणते धोके सांगतात?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news