LPG Booking Rules Change : एलपीजी सिलिंडर ग्राहकांसाठी खूशखबर! रिफिल बुकिंगच्या नियमांत सरकारने केला मोठा बदल

घरगुती एलपीजी (LPG) ग्रामीण अन् शहरी भागातील ग्राहकांसाठी एकच नियम
LPG Booking Rules Change
LPG Booking Rules Changepudhari photo
Published on
Updated on

LPG Booking Rules Change : देशातील घरगुती एलपीजी (LPG) ग्राहकांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील एलपीजी सिलिंडर रिफिल बुकिंगच्या कालावधीत मोठी सवलत देण्यात आली असून, आता शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील ग्राहकांसाठी २५ दिवसांचा समान बुकिंग कालावधी लागू करण्यात आला असल्‍याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि पर्यटन राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी आज (दि. ७ सप्‍टेंबर) केली. सोमवारी यासंदर्भातील घोषणा केली. तेल विपणन कंपन्यांना या सुधारित नियमाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मध्य पूर्व आशियातील तणावामुळे लादले होते निर्बंध

फेब्रुवारी २०२६ मध्ये मध्य पूर्व आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सरकारने १२ मार्च २०२६ रोजी तात्पुरत्या स्वरूपात मागणी व्यवस्थापन (Demand Management) लागू केले होते. त्यानुसार शहरी भागातील ग्राहकांसाठी २५ दिवस, तर ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ४५ दिवसांच्या अंतरानेच पुढील सिलिंडर बुक करण्याचा नियम करण्यात आला होता.

LPG Booking Rules Change
Air India Express Emergency Landing : ३६,००० फुटांवर इंजिन बंद; 'एयर इंडिया एक्स्प्रेस'च्या विमानाचे 'इमर्जन्सी लँडिंग'

ग्रामीण भागातील ग्राहकांना मोठा दिलासा

मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रात नमूद केल्यानुसार, सध्या देशातील एलपीजीचा पुरवठा सुरळीत झाला असून प्रलंबित बुकिंगची संख्या (Backlog) मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे परिस्थितीचे पुनरावलोकन करून सरकारने ग्रामीण भागातील ४५ दिवसांचा बुकिंग कालावधी कमी करून तो २५ दिवसांवर आणला आहे.

LPG Booking Rules Change
Supreme Court : "डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या मोकाट सोडू नका" : महाराष्ट्रातील घटनांबाबत सुप्रीम कोर्टाची तीव्र नाराजी
Pudhari

त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश

पेट्रोलियम मंत्रालयाचे उपसचिव मोहित कुमार अग्रवाल यांनी इंडियन ऑइल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) या तिन्ही प्रमुख तेल विपणन कंपन्यांना (OMCs) या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे आता देशातील सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांना एका सिलिंडरच्या बुकिंगनंतर २५ दिवसांनी दुसरा सिलिंडर बुक करता येणार आहे.

LPG Booking Rules Change
Women's Asia Cup 2026 : भारताने महिला आशिया चषक जिंकल्यास 'ट्रॉफी चोर' नक्वीमुळे पुन्हा रंगणार 'हायव्होल्टेज ट्रॉफी ड्रामा'?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news