Air India Express Emergency Landing : ३६,००० फुटांवर इंजिन बंद; 'एयर इंडिया एक्स्प्रेस'च्या विमानाचे 'इमर्जन्सी लँडिंग'

अबू धाबीसाठी उड्डाण केलेल्या विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित
Air India Express Emergency Landing
प्रातिनिधिक छायाचित्र.File Photo
Published on
Updated on

Air India Express Emergency Landing : कोचीहून अबू धाबीसाठी उड्डाण केलेल्या 'एयर इंडिया एक्स्प्रेस'च्या IX 415 या विमानाचे उड्डाणादरम्यान अचानक इंजिन बंद पडल्याने कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने लँडिंग करण्यात आले. विमानातील ऑईलचे प्रमाण वेगाने कमी झाल्यामुळे आणि ऑईल प्रेशर धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याने वैमानिकांनी ३६,००० फुटांवर असताना एका बाजूचे इंजिन (Engine 1) बंद करून विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरवले. विमानातील प्रवाशांना या गंभीर प्रसंगाची जराही पुसटशी कल्पना आली नाही. सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. दरम्‍यान, भारतीय विमान कंपन्यांच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन मार्ग बदलावा लागण्याच्या घटना आता दर आठवड्याला घडत असल्याचे चित्र आहे.

इंजिन १ मधील ऑईलचे प्रमाण वेगाने कमी

उड्डाणानंतर साधारण ५० मिनिटांनी, विमान ३६,००० फुटांवर असताना वैमानिकांच्या लक्षात आले की इंजिन १ मधील ऑईलचे प्रमाण वेगाने कमी होत आहे.

Air India Express Emergency Landing
Air India Express Emergency Landing : दिल्लीला जाणाऱ्या 'एअर इंडिया एक्स्प्रेस' विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

अबू धाबीचा प्रवास रद्द

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वैमानिकांनी अबू धाबीचा प्रवास रद्द करत विमानाला पुन्हा कोचीकडे वळवण्याचा (निर्णय घेतला. वैमानिकांनी तत्काळ मुंबई रेडिओशी संपर्क साधून एटीसीला याची माहिती दिली.माघारीच्या प्रवासात सुमारे ४५ मिनिटांनंतर ऑईल प्रेशर लाल रंगाच्या धोक्याच्या पट्ट्यात (Red Zone) गेले. त्यानंतर 'नॉन-नॉर्मल चेकलिस्ट' (NNC) नियमावलीनुसार वैमानिकांनी इंजिन १ पूर्णपणे बंद केले.

Air India Express Emergency Landing
Indigo Flight Emergency landing : इंडिगोच्या गोवा-दिल्ली विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; गोवा विमानतळावर ‘इमर्जन्सी’ घोषित

वैमानिकांनी अत्यंत कौशल्याने केले यशस्‍वीरीत्‍या लँडिंग

एकाच इंजिनवर आणि इंधनाचा पूर्ण भार असलेले (Overweight) बोईंग ७३७ विमान उतरवणे अत्यंत जोखमीचे असते; मात्र वैमानिकांनी अत्यंत कौशल्याने हे लँडिंग यशस्वीरीत्या पार पाडले.

विमान वाहतूक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

भारतीय विमान कंपन्यांच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन मार्ग बदलावा लागण्याच्या घटना आता दर आठवड्याला घडत असल्याचे चित्र आहे. नुकतीच 'एयर इंडिया'च्या फुकेत-दिल्ली विमानाची अपघात तपासणी ब्युरोने (AAIB) प्राथमिक चौकशी केली होती, ज्यामध्ये हायड्रोलिक घटकांची तपासणी सुरू आहे. अमेरिकेची 'एफएए' (FAA) संस्था यंदा नोव्हेंबरमध्ये भारताच्या विमान वाहतूक सुरक्षेची पाहणी (IASA ऑडिट) करण्याची शक्यता आहे. यापूर्वी २०२१ मध्ये हे ऑडिट झाले होते. दरम्‍यान, या घटनेबाबत एयर इंडिया एक्स्प्रेस आणि डीजीसीएकडून अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news