Crime News: इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, प्रियकरासाठी महाराष्ट्रातील घर सोडलं; ३ महिन्यांतच पेटीत सापडला सियाचा मृतदेह

live-in partner murder case: इन्स्टाग्रामवर सुरू झालेल्या एका प्रेमसंबंधाचा अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारा अंत भोपाळमध्ये समोर आला आहे.
live-in partner murder case
live-in partner murder casefile photo
Published on
Updated on

live-in partner murder case

भोपाळ : इन्स्टाग्रामवर सुरू झालेल्या एका प्रेमसंबंधाचा अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारा अंत भोपाळमध्ये समोर आला आहे. आपल्या विवाहित प्रियकरासाठी भोपाळ येथे गेलेल्या गोंदियातील ३३ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली असून, तिचा मृतदेह एका लोखंडी पेटीत भरून पण्याच्या टाकीमध्ये फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी २४ तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावत आरोपीच्या कुटुंबातील सदस्यांना अटक केली आहे, मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

live-in partner murder case
Crime News: ११ वीच्या विद्यार्थिनीवर थारमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार आणि iPhone वर शूटिंग; पोलिसाचेही आरोपींशी 'कनेक्शन'

नेमकी घटना काय?

निशातपुरा भागातील एका रिकाम्या भूखंडावरील सेप्टिक टँकमधून गुरुवारी सायंकाळी दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिक मुलांनी केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टँकमधून एक लोखंडी पेटी बाहेर काढली, ज्यामध्ये एका महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला. तपासाअंती हा मृतदेह गोंदिया येथील रहिवासी अश्रफी उर्फ सिया हिचा असल्याचे निष्पन्न झाले.

इन्स्टाग्रामवर झाली होती ओळख

मृत सिया आणि मुख्य आरोपी समीर यांची ओळख वर्षभरापूर्वी इन्स्टाग्रामवर झाली होती. समीर विवाहित असून त्याला दोन मुले आहेत, ही गोष्ट माहीत असतानाही सिया त्याच्या प्रेमात पडली. तीन महिन्यांपूर्वी ती आपले घर सोडून भोपाळला समीरसोबत राहण्यासाठी आली होती. मात्र, तिथे गेल्यावर दोघांमध्ये वारंवार घरगुती वाद होऊ लागले.

live-in partner murder case
Crime News: धक्कादायक! तरुणीवर धावत्या व्हॅनमध्ये ३ तास लैंगिक अत्याचार, नंतर नराधमांनी गाडीतून रस्त्यावर फेकले

लग्नाचा तगादा आणि टोकाचे पाऊल

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया समीरवर लग्नासाठी दबाव टाकत होती. तिने लग्नास नकार दिल्यास ५ लाख रुपयांची मागणी करत कायदेशीर कारवाईची धमकी दिली होती. या वादातून समीरने सोमवारी रात्री सियाचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने आपल्या आई, भाऊ आणि बहिणीच्या मदतीने मृतदेह पेटीत भरला आणि त्यात दगड टाकून तो जवळील पाण्याच्या टाकीमध्ये फेकून दिला.

live-in partner murder case
Crime News: "तू रोज येत जा, ५००० रुपये देईन..." सरपंचाच्या पतीची अल्पवयीन मुलीला अश्लील ऑफर

टॅटूमुळे पटली ओळख

मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवणे कठीण होते. मात्र, सियाच्या हातावर असलेल्या 'दिव्याचा टॅटू' आणि '२६ मे १९९२' या जन्मदिनांकामुळे पोलिसांनी तिची ओळख पटवली.

पोलिसांनी समीरचा भाऊ, आई आणि बहिणीला हत्येचा पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. समीरची पत्नीदेखील पोलिसांच्या तपासाखाली आहे. सध्या समीर फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. तपासात असेही समोर आले आहे की, मृत सियाचे यापूर्वी महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये तीन विवाह झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news