Kulgam terror attack: कुलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर हादरलं; स्थलांतरित मजुरांमध्ये भीती, मोठं सर्च ऑपरेशन सुरू

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
Terror attack
Terror attackfile photo
Published on
Updated on

Kulgam terror attack

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. छत्तीसगडमधील दोन स्थलांतरित मजुरांची नाव आणि धर्म विचारल्यानंतर गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण खोऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षादलांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली असून, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेले शेकडो मजूर प्रचंड दहशतीखाली आहेत.

शुक्रवारी दहशतवाद्यांनी छत्तीसगडचे रहिवासी असलेले दीपक आणि भूपेंद्र यांची नावे आणि धर्म विचारल्यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यानंतर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी कुलगाममध्ये मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. सुरक्षा दलांनी केलम भागापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हबलिषी गावातील रस्ता बंद केला असून, कोणालाही गावात प्रवेश करण्यास किंवा बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

Terror attack
Abhijeet Dipke: अभिजीत दिपकेंच्या परदेशी शिक्षणाचा खर्च कसा केला? माहिती अधिकार कार्यकर्त्याची चौकशीची मागणी

शेकडो कामगार भीतीच्या छायेत

शुक्रवारी झालेल्या या हल्ल्यानंतर लगेचच पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलांच्या संयुक्त पथकाने गावाला वेढा घातला आणि मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली. या घटनेमुळे खोऱ्यातील बाहेरून आलेल्या लोकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कुलगाममधील केलम आणि हबलिषी गावांमध्ये वस्तीपासून दूर, एकांत भागात सुमारे डझनभर विटांच्या भट्टी आहेत. या ठिकाणी शेकडो मजूर काम करतात, ज्यापैकी बहुतांश उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आहेत; हे सर्वजण सध्या भीतीखाली आहेत.

दहशतवादी हल्ल्यानंतर, सुरक्षा दल केवळ हल्लेखोरांचा शोध घेत नाहीत तर या गावांमध्ये राहणाऱ्या इतर मजुरांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे कामही करत आहेत. दरम्यान, तपास यंत्रणा या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या संघटनेची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यामागे कोण आहे याबाबत अद्याप ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. मात्र, काश्मीर खोऱ्यात सध्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेची मर्यादित उपस्थिती असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

'TRF'च्या दाव्याची चौकशी, लतीफ भटवर संशय

अधिकारी सोशल मीडियावरील निनावी पोस्ट्सचाही तपास करत आहेत. या पोस्टमध्ये द रेसिस्टन्स फ्रंट या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांच्या मते, TRF ही लष्कर-ए-तोयबाशी संबंधित 'शॅडो' संघटना मानली जाते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अलीकडील काळात अशा स्वरूपाच्या अनेक हल्ल्यांची जबाबदारी TRF ने स्वीकारली आहे. प्राथमिक गुप्तचर माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाचा कमांडर लतीफ भट हा या हल्ल्यात सहभागी असण्याची शक्यता आहे.

Terror attack
Amit Shah Zero FIR: अमित शाहांना अपशब्द बोलणाऱ्या व्यक्तीविरोधात Zero FIR दाखल; कोणती कलमे लावली?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news