Amit Shah Zero FIR: अमित शाहांना अपशब्द बोलणाऱ्या व्यक्तीविरोधात Zero FIR दाखल; कोणती कलमे लावली?

Amit Shah Zero FIR: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी एका इन्फ्लुएंसरविरोधात झिरो एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
Amit Shah Zero FIR
Amit Shah Zero FIRPudhari
Published on
Updated on

Amit Shah Zero FIR: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह आणि अपमानास्पद व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरविरोधात झिरो एफआयआर (Zero FIR) दाखल करण्यात आली आहे. ही कारवाई लडाखमधील लेह पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपासासाठी हे प्रकरण कर्नाटकमधील मैसूर येथील देवराजा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

लेह पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या लेखी तक्रारीनुसार, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर योगेश परमार याने फेसबुकवर एक व्हिडिओची लिंक शेअर केली होती. या व्हिडिओमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात कथितरित्या आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण आणि अपमानास्पद वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारचा मजकूर सोशल मीडियावर प्रसारित झाल्यास समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो. तसेच सामाजिक आणि सांप्रदायिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल?

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खालील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • कलम 197(1)(d) – राष्ट्रीय एकात्मतेविरोधात कृत्य

  • कलम 352 – शांतता भंग करणे

  • कलम 353(1) – दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित करणे

या कलमांनुसार दोषी आढळल्यास दोन ते तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची आणि दंडाची तरतूद आहे.

Amit Shah Zero FIR
CJP Protest : उगाचच व्हायरल होत नव्हते ‘कॉकरोच पार्टी’चे व्हिडिओ? तीन कंपन्या आणि १०० यूट्यूबर्स पोलिसांच्या रडारवर

मैसूरला का वर्ग करण्यात आलं प्रकरण?

प्राथमिक तपासात संबंधित व्हिडिओ आणि आरोपीचा संबंध कर्नाटकमधील मैसूर येथील असल्याचे समोर आले. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेनुसार लेह पोलिसांनी प्रथम झिरो एफआयआर दाखल करून संपूर्ण केस डायरी पुढील तपासासाठी देवराजा पोलीस ठाण्याकडे पाठवली आहे.

Amit Shah Zero FIR
CJP Protest Viral Reel: एक व्हायरल रील अन् 6 लाख फॉलोअर्स... CJPच्या आंदोलनातील एका रिलने बदललं 19 वर्षाच्या अभिनवचं आयुष्य

झिरो FIR म्हणजे काय?

झिरो एफआयआर म्हणजे गुन्हा नेमका कुठे घडला याची पर्वा न करता कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची सुविधा. त्यानंतर संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्याकडे प्रकरण वर्ग केले जाते. दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता कर्नाटक पोलिसांकडून केला जाणार असून, पुढील चौकशीनंतर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news