

Viral Video Dhoom Boy 2025: सोशल मीडियावर कधी कधी असे व्हिडिओ दिसतात, ज्यामुळे आपल्या डोळ्यांत पाणी येत. झारखंडमधील जमशेदपूर येथून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सध्या देशभरात याच व्हिडिओची चर्चा आहे. लहान वयातच आई-वडिलांचे निधन झाले, कचरा वेचून पोट भरणारा एक अनाथ मुलगा आज फक्त आपल्या आवाजामुळे लाखो लोकांच्या मनात घर करून बसला आहे. पिंटू उर्फ ‘धूम’... जो आता सोशल मीडियावर ‘धूम बॉय’ म्हणून ओळखला जातो.
आई-वडिलांची माया आणि सुरक्षित बालपण त्याला कधी मिळालचं नाही. जमशेदपूरचा पिंटू लहानपणापासूनच काम करु लागला. शिक्षण, खेळणं, मित्रमैत्रिणी यापेक्षा त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं ते रोजचं पोट भरणं. अनेक वर्षे त्याने कचरा वेचून दिवस काढले. पण एका व्हिडिओने त्याचं नशिबच बदललं.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पिंटूचा एक साधा व्हिडिओ आला होता. त्या व्हिडिओत तो अभिनेता ऋतिक रोशनच्या ‘krrish’ चित्रपटातील गाणं आपल्या खास शैलीत गाताना दिसतो. अंगावर साधे कपडे; पण आवाजात प्रामाणिकपणा आणि निरागसता होती. “किरीस का गाना सुनेगा?” हा त्याचा संवाद ऐकून लोक थांबले, ऐकू लागले आणि व्हिडिओ शेअर करू लागले.
पाहता पाहता हा व्हिडिओ व्हायरल झाला. इंस्टाग्रामवर लाखो व्ह्यूज, हजारो रील्स आणि मीम्स तयार झाले. सर्वांनाच उत्सुकता होती की, हा मुलगा नेमका कोण आहे?
जेव्हा लोकांना समजलं की हा मुलगा जमशेदपूरमधील एक अनाथ मुलगा आहे, जो कचरा वेचून आपलं आयुष्य जगत आहे, तेव्हा सोशल मीडिया युजर्सनी केवळ त्याच्या आवाजाचं कौतुक केलं नाही, तर त्याच्या भविष्यासाठी मदतीचा हातही पुढे केला. आज पिंटू उर्फ धूम सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका छोट्याशा व्हिडिओने त्याचं आयुष्य बदललं आहे.