बॉलीवूड सुपरहिरो युनिव्हर्सची ओळख असलेला सिनेमा क्रिशच्या चौथ्या भागांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाविषयी आता मोठी अपडेट समोर आली आहे. निर्माता राकेश रोशन यांनीच क्रिशबाबतची अपडेट शेयर केली आहे. (Latest Entertainment News)
राकेश याबाबत बोलताना म्हणतात, आता बजेटचा प्रश्न सुटला आहे. सिनेमाची स्क्रिप्ट लिहायला अजिबात जास्त वेळ लागला नाही. पण बजेटचा दबाव नक्कीच होता. आता सिनेमाच्या बजेटचा अंदाज आला आहे त्यामुळे आता आम्ही आता सिनेमाच्या तयारीला लागत आहोत. 2027 मध्ये हा सिनेमा रिलीज करण्याचा आमचा मानस आहे. पुढच्या वर्षीच्या मध्यावर शूटिंगला सुरुवात होईल. कारण या सिनेमाचे प्री प्रॉडक्शनचे काम खूप मोठे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी आम्हाला योग्य तयारी करावी लागणार आहे.’
मार्च 2025 मध्ये राकेश रोशन यांनी एक महत्त्वाची घोषणा केली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन आता ते करणार नसून हृतिक या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. यावेळी आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, ‘ डुग्गू 25 वर्षांपूर्वी मी तुला एक अभिनेता म्हणून लॉंच केले होते. आता 25 वर्षांनी मी तुला क्रिश 4चा दिग्दर्शक म्हणून लॉंच करतो आहे. या नव्या कामासाठी तुला यशस्वी होण्यासाठी खूप शुभेच्छा.’
या सिनेमाच्या युनिव्हर्समधील पहिला सिनेमा 2003 मध्ये रिलीज झाला होता. यानंतर 2006 मध्ये क्रिश या पहिल्या भारतीय सूपरहीरोची सुरुवात झाली. या सिनेमात प्रीती झिंटा, रेखा आणि प्रियंका चोप्रा पुन्हा दिसण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या टाइम लाईनवर या सिनेमाचे कथानक बेतले आहे.