Jantar Mantar Protest CEC Resignation: गांधी जयंतीलाच जंतर-मंतरवर आंदोलकांची उचला उचली; ५०० जणांना घेतलं ताब्यात, इंटरनेट बंद

दिल्ली पोलिसांनी या भागातील इंटरनेट १२ तासासाठी सस्पेंड देखील केलं आहे. दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना उचलून जंतर मंतरवरून हटवण्याचा प्रयत्न केला.
Jantar Mantar Protest CEC Resignation
Jantar Mantar Protest CEC Resignationpudhari
Published on: 
Updated on: 

Jantar Mantar Protest CEC Resignation: गांधी जयंतीचे औचित्य साधून विरोधी पक्षांनी आणि कॉक्रोज जनता पार्टीने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं होतं. जमाव बंदीचा आदेश असतानाही शेकडो लोक आणि अनेक विरोधी पक्षाचे नेते आंदोलनासाठी पोहचले होते.

Jantar Mantar Protest CEC Resignation
Jantar Mantar Protest | जंतर-मंतर आंदोलनामध्ये पोलिसांनी इलेक्ट्रिक शॉक उपकरणे, पेलेट गनचा अतिवापर केला, 'ॲम्नेस्टी इंटरनॅशनल'चा अहवाल!

विरोधकांसह ५०० जण ताब्यात

पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली असून आतापर्यंत जवळपास ५०० आंदोलकांना ताब्यात घेतलं असून त्यात आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज, आतिशी आणि संजय सिंह यांचा देखील समावेश आहे. याचबरोबर दिल्ली पोलिसांनी या भागातील इंटरनेट १२ तासासाठी सस्पेंड देखील केलं आहे. दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना उचलून जंतर मंतरवरून हटवण्याचा प्रयत्न केला.

Jantar Mantar Protest CEC Resignation
Jantar Mantar Protests | लैंगिक छळाच्या प्रकरणांची सर्वप्रथम चौकशी होणार : जंतर-मंतर आंदोलन प्रकरणी सरन्यायाधीशांची स्‍पष्‍टोक्‍ती

ट्रॅफिक देखील केलं बंद

दिल्ली पोलिसांनी आज जंतर मंतरवरील आंदोलनाच्या आवाहनानंतर या भागात बॅरिटेक लावले होते. तसेच जंतर मंतर रस्त्याचे ट्रॅफिक देखील बंद केले होते. या ठिकाणी कलम १६३ लागू करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितलं की २ ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी होत असलेल्या या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे.

Jantar Mantar Protest CEC Resignation
Jantar Mantar Protest Site : जंतर-मंतर येथील निदर्शनांचे ठिकाण बंद का करत नाही? दिल्ली उच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

त्यामुळेच दिल्ली पोलिसांनी या भागातील सुरक्षा वाढवली आहे. तसेच गर्दी वाढण्याची शक्यता पाहून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान देखील तैनात करण्यात आले आहेत. जंतर मंतरवरून आतापर्यंत जवळपास ५०० लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news