Jai Patil Death: 'माझ्यावर खोटे आरोप झाले...' जय पाटीलचे मृत्यूपूर्वी आईला भावनिक पत्र; अहमदाबादमधील नर्सिंग कॉलेजमध्ये खळबळ

जय पाटीलनं हे टोकाचं पाऊल उचण्यापूर्वी आपल्या आईला एक भाविक पत्र लिहिलं होतं.
Jai Patil Death
Jai Patil Deathpudhari photo
Published on
Updated on

Jai Patil Nursing Student Death: नर्सिंगच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या जय पाटीलनं भावनिक नोट लिहून आपलं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार अहमदाबादमध्ये घडला. २१ वर्षाचा जय पाटील नादियाद येथील दिनशा पटेल नर्सिंग कॉलेजमध्ये शिकत होता. त्यानं सोमवारी आपल्या मांजीपुरा येथील राहत्या घरात गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपलं.

Jai Patil Death
Crime News: धक्कादायक! पतीने मजेत 'माकड' म्हटलं; मॉडेलिंग करणाऱ्या पत्नीने गळफास घेऊन जीवन संपवलं

आईला लिहिलं भावनिक पत्र

जय पाटीलनं हे टोकाचं पाऊल उचण्यापूर्वी आपल्या आईला एक भाविक पत्र लिहिलं होतं. त्यात जय पाटील दावा करतो की त्याने कधीही त्यांच्या कोणत्याही महिला प्रोफेसरचे बॉडी शेमिंग केलेले नाही. त्याला चुकीच्या पद्धतीनं या प्रकरणात गुंतवण्यात आलाचा आरोप देखील त्यानं पत्रात केला आहे. या प्रकरणामुळं अहमदाबादधील नर्सिंग कॉलेजमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

जय पाटीलने तीन महिन्यापूर्वीच या नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. दरम्यान, घडल्या प्रकारानंतर पोलीस जय पाटीलच्या पत्राच्या आधारे तपास करत आहेत. जय पाटीलने आपल्या पत्रात त्याच्याबद्दल पसरवण्यात आलेला गैरसमज आणि अपमानित करण्यात आल्याने खूप दुःखी होता. त्यानं आपल्या पत्रात कोणताही पुरावा नसताना त्याच्यावर बॉडी शेमिंग केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

Jai Patil Death
Raigad Crime | पेट्रोल बॉम्बस्फोटातील आरोपीला अटक, कॅम्पमधील गोंधळ असह्य झाल्याने केले कृत्य

वडिलांचे कॉलेजवर गंभीर आरोप

दरम्यान, जयचे वडील विजय पाटील यांनी कॉलेज प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी माझ्या मुलाला मुद्दाम एकाकी पाडलं गेलं आणि त्याच्यावर दबाव निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केली गेली असा आरोप केला. त्यांनी पोलिसांना सांगितलं की त्यांनी काही दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये फोन केला होता आणि त्यावेळी कॉलेजने तुमचा मुलगा हा 'अंडर वॉच' आहे. त्याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर त्याचं लिव्हिंग सर्टिफिकेट जारी करण्यात येईल अशी धमकी दिली होती.'

विजय पाटील पुढे म्हणाले, 'शिक्षकांनी माझ्या मुलाला एकाकी पाडलं होतं. तो गेल्या तीन दिवसांपासून अत्यंत दबावात होता. तो डिप्रेशनमध्ये गेला होता.' विजय पाटील यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूला जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Jai Patil Death
crime news | ९ वर्षांचे प्रेमसंबध, दोन महिन्यांचा संसार; पत्नीने आई-वडिलांच्या मदतीने काढला पतीचा काटा!

मर्यादेचे उल्लंघन झाल्यानंतरच हस्तक्षेप

दरम्यान, कॉलेज प्रशासनानं त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही असा दावा केला आहे. ज्यावेळी जय विरूद्ध शिक्षिकेने तक्रार केली अन् मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे वाटल्यानंतर कॉलेजनं यामध्ये हस्तक्षेप केला. असं वक्तव्य नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य विरेंद्र जैन यांनी केलं. त्यांनी कॉलेजने जयने टोकाचं पाऊल उचलल्यावर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अंतर्गत उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे असं सांगितलं.

या प्रकरणाबाबत सर्व शिक्षक आणि स्टाफची स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आली आहेत. यात ज्या तीन महिला प्रोफेसर नेहमी वर्ग सांभाळत होत्या त्यांचा देखील समावेश आहे.

जैन म्हणाले की, 'ही घटना घडण्यापूर्वी दोन आधी कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्याच्या आईसोबत मिटिंग केली होती. त्यात आम्ही विद्यार्थ्याचे समुपदेशन करून हा विषय सोडवण्याचा प्रयत्न केला होता. ज्यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील मर्यादेचे उल्लंघन झाले. त्यानंतर शिक्षकांनी यात हस्तक्षेप केला. याबाबत सुधारित कारवाई किंवा मानसिक छळाचा विषय असेल त्याचा तपास समिती करेल.'

Jai Patil Death
Crime News | 'कमी वेदनेत कसा मृत्‍यू होईल?'...२५ व्हिडिओ पाहून तरुणाने स्वतःला पेटवले की हत्या?

नादियाद शहर पोलीसांनी या प्रकरणी अपघाती निधन अशी केस दाखल केली आहे. मोबाईल फोन रेकॉर्ड्स तपासले जात असून कुटुंबातील सदस्य आणि कॉलेज स्टाफ यांची स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news