Viral Video : 'अत्यंत अस्वच्छ...' : रेल्वे शौचालयात भांडी धुतानाचा व्हिडिओ व्हायरल; FSSAI ची IRCTC ला नोटीस

IRCTC Viral Video | घटनेची सत्‍यता तपासून तत्‍काळ स्‍पष्‍टीकरणाचे आदेश
IRCTC Viral Video
केटरिंग कर्मचारी रेल्‍वेच्या शौचालयामध्ये भांडी धुतानाचा व्‍हिडिओ व्‍हायरल सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे.Pudhari
Published on
Updated on

IRCTC viral video

नवी दिल्ली : केटरिंग कर्मचारी रेल्‍वेच्या शौचालयामध्ये भांडी धुतानाचा व्‍हिडिओ व्‍हायरल सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे. या प्रकरणाची भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) गंभीर दखल घेतली आहे. ट्रेन क्रमांक १२२२३ (लोकमान्य टिळक टर्मिनस-एर्नाकुलम दुरंतो एक्सप्रेस) मधील खाद्यपदार्थांची सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी FSSAI ने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन(IRCTC) वैधानिक नोटीस बजावली आहे.

तत्‍काळ सविस्तर स्पष्टीकरण देण्‍याचे आदेश

FSSAI ने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडिओद्वारे ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. या व्हिडिओमध्ये केटरिंग कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी चालत्या ट्रेनमधील शौचालयात प्रवाशांसाठी वापरली जाणारी केटरिंगची भांडी स्वच्छ करताना दिसत आहेत. हे आरोप 'अत्यंत अस्वच्छ' आणि अन्न सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर चिंतेची बाब असल्याचे सांगत, अन्न नियामकाने (FSSAI) आयआरसीटीसीला या घटनेबाबत तत्‍काळ सविस्तर स्पष्टीकरण आणि 'कारवाई अहवाल' सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

IRCTC Viral Video
Delhi Red Fort Blast | लाल किल्ला परिसरात बॉम्ब बनवण्यासाठी AI चा गैरवापर; राष्ट्रीय तपास यंत्रणेचा खळबळजनक खुलासा

अत्यंत अस्वच्छ पद्धत...

व्‍हायरल होत असलेल्‍या व्‍हिडिओमधील प्रकार जर खरा आढळला, तर तो अन्न हाताळणीतील अत्यंत अस्वच्छ पद्धती दर्शवतो. 'अन्न सुरक्षा आणि मानके (अन्न व्यवसायांचे परवाना आणि नोंदणी) नियम, २०११' च्या अनुसूची ४ अंतर्गत विहित केलेल्या स्वच्छता आणि आरोग्याच्या गरजांचे हे उल्लंघन आहे," असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

IRCTC Viral Video
Palghar Dhanivari Accident | “हा अपघात नाही, व्यवस्थेने केलेला खून”: सुरक्षित क्रॉसिंगच्या अभावामुळे १३ जणांचा बळी

रेल्वे केटरिंग सेवांवरील ग्राहकांचा विश्वास कमी होऊ शकतो

FSSAI ने स्पष्ट केले की, नियमांनुसार अन्न आणि अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या भांड्यांचे दूषितीकरण रोखण्यासाठी अन्न व्यवसाय चालकांनी स्वच्छता, प्रक्रिया, हाताळणी आणि भांडी घासण्याच्या पद्धतींमध्ये अत्यंत काळजी घेणे बंधनकारक आहे.शौचालय परिसरात भांडी घासल्याने अन्न दूषित होण्याचा मोठा धोका निर्माण होतो आणि अन्न सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. अशा प्रकारांमुळे सार्वजनिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि रेल्वे केटरिंग सेवांवरील ग्राहकांचा विश्वास कमी होऊ शकतो.

IRCTC Viral Video
सावधान! रेल्वेची चेन ओढण्याचा विचारही करू नका.. होऊ शकते तुरुंगवारी

FSSAI ने आयआरसीटीसीकडे मागितले स्पष्टीकरण

उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी, FSSAI ने आयआरसीटीसीला या घटनेवर वस्तुस्थितीवर आधारित भाष्य करण्यास सांगितले आहे. तसेच ट्रेनमधील केटरिंग सेवा कंत्राटदारामार्फत चालवली जात होती की परवानाधारकामार्फत, हे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, कंत्राटदाराचा वैध FSSAI परवाना क्रमांकासह संपूर्ण तपशीलही मागवला आहे. तसेच घटनेनंतर आयआरसीटीसीने ताबडतोब कोणत्या सुधारणात्मक उपाययोजना केल्या, याची माहिती मागवली आहे.

IRCTC Viral Video
Donald Trump : 'व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स'’च्या डिनर दरम्यान गोळीबार; हल्‍लेखोराला पकडले

संबंधित कंत्राटदार किंवा कर्मचार्‍यांवर कोणती कारवाई केली?

या कथित उल्लंघनासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदार किंवा कर्मचाऱ्यांवर काय कारवाई सुरू करण्यात आली आहे, याचा तपशील मागितला आहे. ट्रेनमध्ये तैनात असलेल्या अन्न हाताळणाऱ्या आणि केटरिंग कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या 'फूड सेफ्टी ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन' (FoSTaC) कार्यक्रमांचा तपशील, त्यांच्या प्रशिक्षणाची श्रेणी आणि वैधता याचीही माहिती मागवण्यात आली आहे.भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी FSSAI ने आयआरसीटीसीला अन्न सुरक्षा आणि मानक नियमांच्या अनुसूची ४ चे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. नियामकाने आयआरसीटीसीला या प्रकरणाला अत्यंत प्राधान्य देऊन आजच आपला कारवाई अहवाल (ATR) आणि उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news