Ugram Battle Rifle : मेड-इन-इंडिया 'उग्रम' रायफल १०० दिवसांत तयार, CAPF मध्ये समावेशासाठी सज्ज

भारतीय लष्करासह गृह मंत्रालयाच्‍या प्रमुख चाचण्या 'उग्रम' बॅटल रायफलने केल्‍या यशस्वीरीत्या पूर्ण
Ugram Battle Rifle
Ugram Battle Rifle Pudhair
Published on
Updated on

Ugram Battle Rifle : स्वदेशी संरक्षण उत्पादनाला चालना देण्याच्या भारताच्या मोहिमेत तेलंगणास्थित 'द्विपा डिफेन्स'ने एक मोठा टप्पा गाठला आहे. कंपनीच्या 'उग्रम' (UGRAM) ७.६२x५१ मिमी बॅटल रायफलने भारतीय लष्कर आणि गृह मंत्रालय यांच्या प्रमुख चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांकडून (CAPF) ही रायफल खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

'उग्रम' रायफलची निर्मिती सर्वात जलद

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) 'आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट' (ARDE) सोबत संयुक्तपणे विकसित केलेली 'उग्रम' रायफल अवघ्या १०० दिवसांत डिझाइन आणि तयार करण्यात आली आहे. देशातील सर्वात जलद स्वदेशी शस्त्र विकास कार्यक्रमांपैकी हा कार्यक्रम ठरला आहे.

Ugram Battle Rifle
Coal gasification plants | देशात कोळशापासून गॅस तयार होणार, ३७ हजार ५०० कोटी रुपयांच्या योजनेला केंद्राची मंजूरी

सर्व चाचण्‍या यशस्वीरीत्या पूर्ण

रायफलने आर्मी जनरल स्टाफ क्वालिटेटिव्ह रिक्वायरमेंट चाचण्या, सर्व प्रकारच्या हवामानातील क्षेत्रीय मूल्यमापन (field evaluations) आणि गृह मंत्रालयाच्या बोर्ड चाचण्या यशस्वीपणे पार केल्या आहेत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शिबू जोसेफ यांनी सांगितले की, द्विपा डिफेन्सला २०२१ मध्ये उत्पादनाचा परवाना मिळाला होता. त्यानंतर हैदराबादमध्ये तेलंगणा सरकारने दिलेल्या १३ एकरपेक्षा जास्त जागेवर कंपनीने एक सुसज्ज उत्पादन केंद्र उभारले आहे.

Ugram Battle Rifle
DME LPG Alternative India: एलपीजीसाठी देशी पर्याय असलेले 'डीएमई' काय आहे? पुण्यात एनसीएलला मोठं यश

'उग्रम'कडून १०० हून अधिक स्वदेशी शस्त्र प्रणाली विकसित

"आमचा प्रवास २०२१ मध्ये मिळालेल्या मॅन्युफॅक्चरिंग लायसन्सने सुरू झाला. आज आम्ही १०० हून अधिक स्वदेशी शस्त्र प्रणाली आणि त्यांचे विविध प्रकारविकसित केले आहेत, ज्यामध्ये 'उग्रम' हे आमचे मुख्य उत्पादन (flagship platform) म्हणून समोर आले आहे. भारतीय सुरक्षा दलांसाठी भारतातच जागतिक दर्जाची संरक्षण उत्पादने बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असेही जोसेफ यांनी स्‍पष्‍ट केले.

Ugram Battle Rifle
LPG cylinder: ५ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी आता एड्रेस प्रूफची गरज नाही; फक्त 'हे' एक कार्ड दाखवा आणि सिलेंडर घरी न्या!

रायफलचे वजन ४ किलोपेक्षा कमी, प्रभावी क्षमता ५०० मीटर

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या रायफलने दीर्घकाळ टिकण्याची आणि विश्वासार्हतेची व्यापक चाचणी पूर्ण केली आहे. आता सीआरपीएफ (CRPF), आयटीबीपी (ITBP), एसएसबी (SSB) आणि एनएसजी (NSG) द्वारे या रायफलच्या खरेदीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. 'उग्रम' रायफलमध्ये आधुनिक गॅस-ऑपरेटेड रोटेटिंग बोल्ट सिस्टम आहे. या रायफलचे वजन ४ किलोग्रॅमपेक्षा कमी असून तिची प्रभावी क्षमता ५०० मीटर आहे.कंपनी सध्या असॉल्ट रायफल्स, कार्बाइन्स, सब-मशीन गन, लाइट मशीन गन आणि अँटी-ड्रोन सिस्टमसह स्वदेशी शस्त्रांची एक संपूर्ण मालिका विकसित करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news