LPG cylinder: ५ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी आता एड्रेस प्रूफची गरज नाही; फक्त 'हे' एक कार्ड दाखवा आणि सिलेंडर घरी न्या!

आता कायमस्वरूपी पत्त्याचा पुरावा नसला तरीही ५ किलोचा छोटा एलपीजी सिलिंडर सहज उपलब्ध होणार आहे.
LPG cylinder
LPG cylinderfile photo
Published on
Updated on

LPG cylinder

नवी दिल्ली: आता कायमस्वरूपी पत्त्याचा पुरावा नसला तरीही ५ किलोचा छोटा एलपीजी सिलिंडर सहज उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी कागदपत्रांची अट शिथिल केल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचा विद्यार्थी, स्थलांतरित मजूर आणि नोकरीनिमित्त शहरात राहणाऱ्या तरुणांना फायदा होणार आहे.

भारत पेट्रोलियमच्या 'भारतगॅस मिनी' आणि इंडियन ऑइलच्या 'इन्डेन छोटू' (५ किलो) यांसारख्या योजनांतर्गत, केवळ सरकारमान्य ओळखपत्र (आधार, मतदार ओळखपत्र, वाहन परवाना, पॅन कार्ड इत्यादी) सादर करून गॅस सिलिंडर त्वरित खरेदी करता येतो. पत्त्याच्या पुराव्यासाठी लागणाऱ्या लांबलचक प्रक्रियेतून आता ग्राहकांची सुटका झाली आहे.

LPG cylinder
LPG cylinder gas | घरातील सिलिंडरमधील गॅस कसा बनवतात?

कोणाला होणार फायदा?

वसतिगृहात किंवा पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या तरुणांना याचा मोठा लाभ होईल.

कामासाठी सतत शहरे बदलणाऱ्या मजुरांसाठी ही सुविधा सोयीची ठरेल.

ज्यांच्याकडे भाडेकरार किंवा पत्त्याचा ठोस पुरावा नाही, अशा कुटुंबांना तातडीने गॅस मिळेल.

ज्यांची गॅसची गरज कमी आहे किंवा ज्यांना तात्पुरत्या स्वरूपात इंधन हवे आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

हे ५ किलोचे सिलिंडर वजनाला हलके आणि पोर्टेबल असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे अत्यंत सोपे आहे. ग्राहक आपल्या जवळच्या भारतगॅस किंवा इंडेन वितरकाकडून किंवा अधिकृत विक्री केंद्रावरून ठराविक अनामत रक्कम भरून हा सिलिंडर घेऊ शकतात.

ही आहेत वैशिष्ट्ये

कोणत्याही पत्त्याच्या पुराव्याशिवाय त्वरित उपलब्ध.

देशभरातील वितरकांकडे रिफिलची सुविधा उपलब्ध.

सिलिंडर नको असल्यास तो परत करून अनामत रक्कम परत मिळवण्याची सोय.

LPG cylinder
LPG cylinder 10kg: मोठी बातमी! आता १० किलोचाच मिळणार एलपीजी सिलिंडर? तेल कंपन्यांचा सरकारकडे प्रस्ताव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news