Unpaid Work India : भारतात तब्बल २४ टक्के लोकं करतात बिना पगाराचं काम! पीपल वर्क २०२६ च्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Unpaid Work India
Unpaid Work Indiapudhari
Published on
Updated on

People at Work 2026 Report Unpaid Work India: एडीपीच्या पीपल अॅट वर्क २०२६ च्या रिपोर्टनुसार भारतात प्रत्येक आठवड्यात १६ किंवा तापेक्षा जास्त लोक बिना पैशाचे काम करत आहेत. अशा लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. इतर ४० टक्के श्रमिक प्रत्येक सप्ताहात सहा ते पंधरा तास पगाराविना काम करतात. याचा सोप्या भाषेत अर्थ असा आहे की भारतात असे अनेक लोकं आहेत ज्यांना अतिरिक्त पैसे न मिळता जास्त तास काम करावं लागतं.

Unpaid Work India
MSEDCL Unpaid Employees | महावितरणचे कंत्राटी यंत्रचालक पगाराविना

दुसरीकडे जगभरात भारताएवढी स्थिती गंभीर नाहीये. ६२ टक्के कर्मचारी आठवड्यात ५ तास बिना पगाराचे काम करत आहेत. २६ टक्के कर्मचारी हे ६ ते १५ तास आणि १२ टक्के कर्मचारी आठवड्यात १६ तास पगाराविना काम करत आहेत.

Unpaid Work India
ASHA worker unpaid salary : रायगडमधील आशासेविका चार महिने मानधनाविना

यावरून असा प्रश्न उपस्थित होतो की नेमकं असं का होतंय? जास्त तास बिना पगार काम केल्यानं ते काम चांगलं होतंय असंही नाहीये. यामुळे कामाचा ताण वाढतो तसेच कामावरून मन देखील उडतं. रिपोर्टनुसार जो कर्मचारी बिना पगार जास्त काम करतो. तो आपल्या पूर्ण क्षमतेनं काम करू शकत नसल्याची शक्यता जास्त आहे. असे कर्मचारी तनाव आणि नोकरी सोडण्याचा विचार देखील जास्त प्रमाणात करतात असं आढळून आलं आहे.

जे कर्मचारी आठवड्यात १६ तास जास्त काम करतात अन् त्याचे त्यांना वेतन देखील मिळत नाही. त्यांना आपल्या कामात जास्त रस आहे आणि ते आपल्या कामाशी जास्त जोडलेले असतात. मात्र अशा लोकांची प्रोडक्टिव्हिटी आणि आनंदीपणा कमी होता. तसेच ते दुसरी नोकरी शोधण्याची इच्छा देखील तीव्र होती.

Unpaid Work India
Viral News: '१ मिनिट जास्त जेवलात, तर १ तास फुकट काम करा'; कंपनीची अजब नोटीस व्हायरल

दुरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये देखील बिना वेतन जास्त तास काम करण्याचा ट्रेंड राहतो. ही समस्या फक्त ऑफिसमधून काम करणाऱ्यांच्या बाबतीत नाहीये. रिमोट वर्क करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि हायब्रिड, ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांच्या तुलनेत बिना पगार जास्त तास काम करण्याची शक्यात देखील अधिक आहे. युवा कर्मचारी देखील बिना वेतन जास्त तास काम करत असल्याचं सांगतात. रिपोर्टनुसार बिना पगार काम करण्याने कर्मचाऱ्यांची उत्पादता, आरोग्य आणि नोकरी टीकवण्यावर प्रभाव पडू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news