Viral News: '१ मिनिट जास्त जेवलात, तर १ तास फुकट काम करा'; कंपनीची अजब नोटीस व्हायरल

दुपारच्या जेवणासाठी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा एक मिनिट जरी जास्त घेतला, तर एक तास जादा काम करावे लागेल," अशी एका कंपनीची अजब नोटीस सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral office Eat faster notice
Viral office Eat faster noticeFile Photo
Published on
Updated on

Viral office Eat faster notice

नवी दिल्ली: दुपारच्या जेवणासाठी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा एक मिनिट जरी जास्त घेतला, तर कार्यालयात एक तास जादा आणि तेही फुकट काम करावे लागेल," अशी एका कंपनीची अजब नोटीस सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या विचित्र नियमामुळे कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा येत असल्याची टीका होत असून, नेटकऱ्यांनी या कॉर्पोरेट संस्कृतीवर संताप व्यक्त केला आहे.

ही नोटीस कोणत्या कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी आहे हे अस्पष्ट असली तरी त्यात जेवणाच्या वेळेवरून कर्मचाऱ्यांवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. "३० मिनिटांच्या जेवणाच्या सुट्टीनंतर तुम्ही जितकी मिनिटे जास्त घ्याल, त्या प्रत्येक १ मिनिटासाठी सायंकाळी ६ नंतर १ तास अतिरिक्त आणि विनामोबदला काम करावे लागेल," असे या नोटीसमध्ये स्पष्ट लिहिले आहे.

Viral office Eat faster notice
Success Story: पगार सोडून तरुणीने एका महिन्यात कमावले ६३ लाख रुपये; सांगितले उत्पन्नाचे ६ स्रोत

या नियमाचे उदाहरण देताना व्यवस्थापनाने पुढे लिहिले आहे की, "उदा. जर तुम्हाला ३१ मिनिटे जेवणासाठी लागली, तर तुम्हाला सायंकाळी ६ ऐवजी ७ वाजता कार्यालय सोडावे लागेल." धक्कादायक बाब म्हणजे, या नोटीसचा शेवट लवकर जेवा अशा उद्धट सूचनेने करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

ही नोटीस 'एक्स' आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने लिहिले की, "जर १ मिनिटासाठी १ तास अतिरिक्त काम करावे लागत असेल, तर कर्मचाऱ्यांनीही सायंकाळी ६ वाजून १ मिनिटापर्यंत थांबल्यास १ तासाचा अतिरिक्त पगार मागितला पाहिजे." काहींनी या निमित्ताने पुन्हा एकदा 'वर्क फ्रॉम होम'चे समर्थन केले आहे. "अशा हुकूमशाही नियमांमुळेच लोक ऑफिसला जाण्याऐवजी घरून काम करण्याला प्राधान्य देतात," अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली.

Viral office Eat faster notice
Success Story: महिन्याला २ लाखांची कमाई, तरीही करतोय सरकारी नोकरीची तयारी; तरुण उद्योजकाचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news