Nutrition Study : देशात आहारातही 'श्रीमंत-गरीब' दरी..! श्रीमंत लोक गरिबांपेक्षा १.५ पट अधिक प्रोटीन करतात फस्‍त!

भाज्या, फळे आणि कडधान्ये यासारख्या प्रमुख अन्न गटांचे आहारात सेवन कमी
Nutrition Study
Ai Generated Image
Published on
Updated on
Summary

सर्वांचाच आहारात तेल, मीठ आणि साखरचे प्रमाण जास्‍त

श्रीमंताच्‍या आहारात दुधाची मात्र ११० टक्‍यांहून अधिक

प्राण्यांपासून बनवलेल्या प्रोटीनच्या स्रोतांची उपलब्धता अधिक

CEEWच्‍या नवीन स्वतंत्र अभ्यासातून भारतीयांच्‍या आहारावर प्रकाशझोत

India nutrition gap

नवी दिल्‍ली : भारतीयांच्या आहारातील जवळजवळ अर्धा प्रोटीनयुक्‍त आहार तांदूळ, गहू, रवा आणि रिफाइंड पीठ यासारख्या धान्यांमधून मिळतात. भारतातील सर्वात श्रीमंत १० टक्के लोक गरीबांपेक्षा घरी १.५ पट जास्त प्रथिने वापरतात आणि त्यांना प्राण्यांपासून बनवलेल्या प्रथिनांच्या स्रोतांची उपलब्धता जास्त असते, अशी माहिती ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषदेच्या (CEEW) नवीन स्वतंत्र अभ्यासातून समोर आली आहे.

देशात दररोज सरासरी ५५.६ ग्रॅम प्रोटीनचा वापर

२०२३-२४ च्या NSSO घरगुती वापर खर्च सर्वेक्षणाच्या आकडेवारीवर आधारित आहारातील ट्रेंडचे विश्लेषण केले आहे. यानुसार, भारतीय लोकांच्‍या दररोज आहारात सरासरी ५५.६ ग्रॅम प्रोटीनचा वापर होतो; परंतु या अभ्यासात असे आढळून आले की, यापैकी सुमारे ५० टक्के प्रोटीन हे धान्यांमधून मिळते. कमी दर्जाचे अमीनो आम्ल असतात आणि ते सहज पचत नाहीत. प्रथिनांमध्ये धान्यांचा हा वाटा राष्ट्रीय पोषण संस्थेने (NIH) शिफारस केलेल्या 32 टक्के पेक्षा खूपच जास्त आहे.

Nutrition Study
Eggs and high cholesterol: अंड्यासोबत 'हे' पदार्थ खात असाल तर धोका! तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा

आहारात तेल, मीठ आणि साखरचे प्रमाण जास्‍त

डाळी, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी/मासे/मांस यांसारखे उच्च-गुणवत्तेचे प्रथिन स्रोत आहारातून वगळले जात आहेत. प्रथिने शारीरिक वाढ, पुनर्प्राप्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. CEEW अभ्यासात असेही आढळून आले की, भाज्या, फळे आणि कडधान्ये यासारख्या प्रमुख अन्न गटांचे आहारात सेवन कमी आहे, तर स्वयंपाकाचे तेल, मीठ आणि साखर जास्त आहे.

Nutrition Study
शेंगदाणे की बदाम... आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर?

गरीब-श्रीमंताच्‍या आहारातील तफावत दर्शवते असमानता

CEEW चे संशोधक अपूर्व खंडेलवाल यांनी म्‍हटलं आहे की, या अभ्यासातून भारताच्या अन्न व्यवस्थेतील एक लपलेले संकट स्‍पष्‍ट झाले आहे. कमी-गुणवत्तेच्या प्रथिनांवर जास्त अवलंबून राहणे, धान्ये आणि तेलांमधून जास्त कॅलरीज घेणे आणि विविध आणि पोषक तत्वांनी समृद्ध अन्नाचा अपुरा वापर. सर्वात गरीब 10 टक्के कुटुंबातील व्यक्ती आठवड्यातून दोन केळीइतकेच फक्त दोन ते तीन ग्लास दूध आणि फळे घेते, तर सर्वात श्रीमंत 10 टक्के कुटुंबातील व्यक्ती आठ ते नऊ ग्लास दूध आणि आठ ते दहा केळीइतकेच फळे घेते. ही आहारातील तफावत संतुलित आहाराच्या उपलब्धतेतील व्यापक असमानता दर्शवते.

Nutrition Study
Fruit Peels Nutrition Value | भाज्या-फळांची सालं म्हणजे आरोग्याचा खजिना, फेकण्याआधी दोनदा विचार करा!

प्रोटीनच्‍या सेवनात झाली वाढ

गेल्या १२ वर्षांत (२०११-१२ ते २०२३-२४) भारतीयांचे दररोजचे सरासरी प्रोटीनचे सेवन वाढले आहे. ग्रामीण भागातील दररोज प्रति व्यक्ती सरासरी प्रथिने सेवन ६०.७ ग्रॅमवरून ६१.८ ग्रॅमपर्यंत वाढले.तर शहरातच हे प्रमाण प्रति व्यक्ती सरासरी प्रथिने सेवन ६०.३ ग्रॅमवरून ६३.४ ग्रॅमपर्यंत वाढले आहे. मात्र प्रत्‍यक्षात प्रोटीन सेवनात मोठी आर्थिक विषमता (गरिबी-श्रीमंतीमधील फरक) आहे. देशातील सर्वात श्रीमंत १० टक्के लोक हे सर्वात गरीब लोकांपेक्षा १.५ पट जास्त प्रथिने खातात, असेही सर्वेक्षणात स्‍पष्‍ट झाले आहे.

Nutrition Study
Anganwadi Child Nutrition : हजारो अंगणवाड्यांतील बालक आहारापासून वंचित

श्रीमंताच्‍या आहारात दुधाची मात्र ११० टक्‍यांहून अधिक

दुधाचे उदाहरण: ग्रामीण भागातील सर्वात गरीब १० टक्के लोक शिफारस केलेल्या दुधाच्या सेवनापैकी (आवश्यक प्रमाणापैकी) फक्त एक तृतीयांश (१/३) इतकेच दूध पितात. याउलट, सर्वात श्रीमंत लोक शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा ११० टक्क्यांहून अधिक दूध पितात.

Nutrition Study
School Nutrition Scheme : शालेय पोषण आहारातून केळी, अंडी गायब

डाळी सेवनाचे प्रमाण शिफारस केल्‍यापेक्षा १९ टक्क्यांनी कमी

अंडी, मासे आणि मांस यांच्या बाबतीतही असाच ट्रेंड दिसून येतो. सर्वात गरीब कुटुंबे NIN शिफारस केलेल्या सेवनाच्या (शिफारस केलेल्या दैनिक भत्त्याच्या) फक्त ३८ टक्केच पूर्ण करतात, तर सर्वात श्रीमंत कुटुंबे १२३ टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. त्यांचे महत्त्व असूनही, तूर, हरभरा आणि मसूर यासारख्या डाळी आता भारतातील प्रोटीन सेवनाच्या फक्त ११ टक्के आहेत, जे शिफारस केलेल्या १९ टक्क्यांपेक्षा खूपच कमी आहेत आणि सर्व राज्यांमध्ये त्यांचे सेवन देखील कमी आहे.

Nutrition Study
Diet Tips | आरोग्याचा मंत्र! पोटाला 'कचरापेटी' बनवू नका; डॉ. दीक्षित यांनी कोल्हापुरात दिला महत्त्वाचा सल्ला

भारतीयांचा पोषणाचे संतुलन बिघडले

आजकाल भारतीयांचा आहार प्रामुख्याने धान्ये (Cereals) आणि स्वयंपाकाचे तेल यावर जास्त अवलंबून आहे. यामुळे आपल्या शरीराच्या पोषणाचे संतुलन बिघडले आहे.आपल्या आहारातले जवळजवळ ७५% कर्बोदके फक्त धान्ये (गहू, तांदूळ) पुरवतात. आपण आवश्यकतेपेक्षा दीडपट (१.५ पट) जास्त धान्य खातो. रेशनवर (सार्वजनिक वितरण प्रणाली) स्वस्त तांदूळ आणि गहू मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने, गरीब १० टक्‍के लोकांमध्ये हा वापर जास्त आहे. ज्वारी, बाजरी आणि नाचणी (मिलेट्स) यांसारख्या आरोग्यदायी धान्यांचा वापर घरात सर्वात जास्त कमी झाला आहे. गेल्या १० वर्षांत, त्यांचा वापर प्रति व्यक्ती सुमारे ४० टक्‍के घटला आहे. आपण शिफारस केलेल्या (आवश्यक) भरड धान्यांपैकी फक्त १५% च खातो. गेल्या दशकात, आवश्यकतेपेक्षा दीडपट जास्त चरबी/तेल वापरणारी कुटुंबे दुप्पट झाली आहेत.: श्रीमंत (उच्च उत्पन्न) कुटुंबे गरीब (कमी उत्पन्न) कुटुंबांच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट चरबीचे सेवन करतात, अशीही माहिती ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषदेच्या (CEEW) नवीन स्वतंत्र अभ्यासातून समोर आली आहे.

Nutrition Study
Liquid Diets: लिक्विड डाएटनं खरंच वजन कमी होतं?

अन्न विविधता आवश्यक

देशातील बहुतांश लोकांचा आहार हा काही ठराविक पिकांवर (उदा. गहू, तांदूळ) जास्त अवलंबून आहे. यामुळे हवामानातील बदलांशी जुळवून घेण्याची आपली क्षमता कमी होते. आपल्या आहारात आणि शेतात पिकवल्या जाणाऱ्या अन्न पुरवठ्यात विविधता आणणे हे देशासाठी एक महत्त्वाचे काम असल्‍याचेही अभ्यासात नमूद करण्‍यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news