Vande Bharat Sleeper Train Ticket: कुठे धावणार देशातील पहिली 'स्लीपर' वंदे भारत एक्सप्रेस... जाणून घ्या तिकीटाचे नियम अन् दर

First Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ट्रेनमध्ये ग्राहकांना किमान ४०० किलोमीटरपर्यंतच भाडं द्यावं लागणार आहे.
Vande Bharat Sleeper Train Ticket
Vande Bharat Sleeper Train Ticketpudhari photo
Published on
Updated on

Vande Bharat Sleeper Train Ticket: भारतात देशातील पहिली वंदे भारत स्पीपर ऐक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार आहे. मात्र या नव्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या तिकीटाचे नियम हे पूर्वीसारखे असणार नाहीत. याचबरोबर इतर राजधानी एक्सप्रेस ट्रनच्या तुलनेत याचे तिकीटदरही थोडे जास्त असणार आहेत.

Vande Bharat Sleeper Train Ticket
Vande Bharat : जालन्यात 'वंदे भारत' रेल्वेची म्हशीला धडक

पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार

याचबरोबर वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ट्रेनमध्ये ग्राहकांना किमान ४०० किलोमीटरपर्यंतच भाडं द्यावं लागणार आहे. देशातील पहिल्या स्लीपर एक्सप्रेस ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या आठवड्यात हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यात आहे. ही ट्रने गुवाहाटी ते हावाडा या स्टेशनमध्ये धावणार आहे. ही वंदे भारत ट्रेन ही इतर एक्सप्रेस ट्रेन्स पेक्षा तीन तास कमी वेळेत पोहचणार आहे.

Vande Bharat Sleeper Train Ticket
Indian Railway Dress Code: आता रेल्वे अधिकाऱ्यांचे काळे कोट जाणार... ब्रिटीश काळातील नावं देखील बदलणार

RAC ची सिस्टम नसणार

रेल्वे बोर्डाने ९ जानेवारी रोजी आपले सर्कुलर प्रसिद्ध करत 'वंदे भारतसाठी किमान ४०० किलोमीटरपर्यंतचं भाडं द्यावं लागणार आहे. या ट्रेनमध्ये RAC पद्धत नाहीये. त्यामुळे फक्त कन्फर्म तिकीटच दिलं जाईल. त्यामुळे RAC किंवा वेटलिस्ट, काही अंशी कन्फर्म तिकीट याची सोय असणार नाही. सर्व बर्थ हे अॅडव्हान्स रिजरवेशन पीरिएडच्या पहिल्या दिवसांपासूनच उपलब्ध असणार आहेत.

Vande Bharat Sleeper Train Ticket
Woman Delivery in train: महिलेची रेल्वे डब्यात प्रसूती, सहप्रवासी, महिला पीएसआय ठरले ‌‘देवदूत‌’

महिला अन् PwD साठी असणार कोटा

इतर ट्रेनमध्ये वेटिंग तिकीट हे कनफर्म झालं नाही तर आपोआप ते कॅन्सल होत होतं. तर RAC तिकीटाच्या वेळी साईड लोअर सीटवर दोन प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जात होती. मात्र वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये ही व्यवस्था असणार नाही. इतर ट्रेनसारखे वंदे भारत मध्ये ही व्यवस्था असणार नाही. इतर ट्रेनसारखे वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये महिला, PwD, वृद्ध नागरिक याच्याशिवाय स्टाफसाठी ड्युटी पास कोटाची व्यवस्था असणार आहे.

वंदे भारत स्लीपरचं भाडं किती?

वंदे भारत स्लीपल एक्सप्रेस ट्रेनचे ३ AC चे भाडे हे २.४ रूपये प्रतिकिलोमीटर असणार आहे. तर २ AC चे भाडे हे प्रति किलोमीटर ३.१ रूपये, १ AC चे भाडे हे ३.८ रूपये प्रतिकिलोमीटर असणार आहे.

  • ३ एसी - प्रति किलमोटीर २.४ रूपये

  • २ एसी - प्रति किलोमीटर ३.१ रूपये

  • १ एसी - प्रति किलोमीटर ३.८ रूपये

Vande Bharat Sleeper Train Ticket
Vande Bharat Express | चार नवीन वंदे भारत गाड्यांना पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा कंदील

जर हिशेब केला तर वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी कमीत कमी (४०० किलोमीटरसाठी) किती पैसे मोजावे लागतील.

  • ३ एसी - किमान भाडे ९६० रूपये

  • २ एसी - किमान भाडे १२४० रूपये

  • १ एसी - किमान भाडे १५२० रूपये

Vande Bharat Sleeper Train Ticket
Vande Bharat Cleanliness Pune: ‘वंदे भारत’मध्ये कचरा टाकलात तर होणार कारवाई; पुणे रेल्वे विभागाची नवीन सूचना

१००० किलोमीटरसाठी किती भाडे?

  • ३ एसी - 2400 रूपये

  • २ एसी - 3,100 रूपये

  • १ एसी - 3,800 रूपये

२००० किलोमीटरसाठी किती भाडे?

  • ३ एसी - 4800 रूपये

  • २ एसी - 6200 रूपये

  • १ एसी - 7600 रूपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news