Supreme Court EV charger petition |'ईव्ही चार्जर'साठी हौसिंग सोसायटीने परवानगी नाकारली, कार मालकाची थेट सुप्रीम कोर्टात धाव

Supreme Court EV charger petition |'सर्वोच्‍च न्‍यायालयाची केंद्र सरकारसह उत्तर प्रदेश सरकारला नोटीस
Supreme Court EV charger petition
प्रातिनिधिक फोटो.pudhari photo.
Published on
Updated on

Supreme Court EV charger petition

नवी दिल्ली : घराच्या पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग पॉईंट बसवण्यास गृहनिर्माण सोसायटीने मज्जाव केल्याने कार मालकाने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेची दखल घेत सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि नोएडातील संबंधित गृहनिर्माण सोसायटीला नोटीस बजावली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ एप्रिल रोजी होणार आहे.

हौसिंग सोसायटीने 'एनओसी' नाकारले

ग्रेटर नोएडा येथील 'निराला इस्टेट फेज ३' मध्ये राहणारे रचित कट्याल यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. कट्याल यांनी एक इलेक्ट्रिक कार खरेदी केली होती. आपल्या हक्काच्या पार्किंग जागेत स्वखर्चाने चार्जर बसवण्यासाठी त्यांनी २६ मे २०२५ रोजी सोसायटीकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी (NOC) अर्ज केला होता. सर्व सुरक्षा मानकांचे पालन करण्याचे आश्वासन देऊनही सोसायटीने त्यांना परवानगी नाकारली. सोसायटीमध्ये ४,००० सदनिका आणि ५६ इलेक्ट्रिक वाहने असताना केवळ दोनच चार्जिंग पॉईंट उपलब्ध आहेत, जे अपुरे असल्याचे याचिकेत नमूद करण्‍यात आले आहे.

Supreme Court EV charger petition
Supreme Court | जमीन मालकांना 'सर्वोच्‍च' दिलासा! बिल्डरने बांधकाम उशिरा केल्यास जमीन मालक जबाबदार नाही : सुप्रीम कोर्ट

याचिकाकर्त्याने कोणता दावा केला?

उर्जा मंत्रालयाने १७ सप्टेंबर २०२४ रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रहिवाशांना त्यांच्या नियुक्त पार्किंग जागेत खाजगी ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याची स्पष्ट मुभा आहे. ही तत्त्वे पाळण्यास गृहनिर्माण सोसायट्या आणि राज्य प्रशासन अपयशी ठरत असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.

Supreme Court EV charger petition
Supreme Court|"तुम्ही मला चंदीगडमध्ये पाहिले आहे.." सरन्यायाधीशांच्या एका वाक्याने सुप्रीम कोर्टात शांतता; सुनावणीवेळी काय घडलं?

याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे

  • प्रभावी अंमलबजावणी अभावी राज्यघटनेच्या कलम १४, १५, १६ आणि २१ मधील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे.

  • ई-मोबिलिटीला चालना देणे हे भारताच्या पर्यावरणीय उद्दिष्टांसाठी आवश्यक आहे.

  • महाराष्ट्रात गृहनिर्माण सोसायट्यांना ७ दिवसांच्या आत ईव्ही चार्जरसाठी एनओसी देणे बंधनकारक करण्यात आले आहे, तसाच नियम देशभरात लागू करण्‍यात यावा

Supreme Court EV charger petition
Supreme Court| "ऑनलाईन मजकूर हटवण्याचे आदेश देण्याचा दंडाधिकाऱ्यांना अधिकार नाही"

केंद्र व राज्‍य सरकारला आदेश देण्‍याची मागणी

याचिकाकर्त्यातर्फे वकील श्रीराम परक्कत आणि सुभाष चौधरी यांनी बाजू मांडली. २०२४ च्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश द्यावेत, तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये खाजगी चार्जर बसवण्यासाठी नियमावली तयार करावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news