Section 377 Marital Ruling | पती-पत्नीमधील 'अनैसर्गिक' संबंध हा गुन्हा ठरत नाही; हायकोर्टाचा निकाल

Section 377 Marital Ruling |पतीविरोधातील 'कलम ३७७' अंतर्गत कारवाई रद्द करण्‍याचे आदेश
Section 377 Marital Ruling | पती-पत्नीमधील 'अनैसर्गिक' संबंध हा गुन्हा ठरत नाही; हायकोर्टाचा निकाल
Published on
Updated on

Section 377 Marital Ruling

ग्वाल्हेर : सज्ञान पती-पत्नीमधील विशिष्ट प्रकारचे लैंगिक कृत्य हे भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३७७ नुसार 'अनैसर्गिक गुन्हा' मानले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मध्‍य प्रदेश उच्‍च न्‍यायालयाने नुकताच दिला आहे. , कायद्यातील बलात्काराची सुधारित व्याख्या आणि वैवाहिक संबंधांना मिळालेले कायदेशीर संरक्षण पाहता अशा तक्रारी कायदेशीर निकषांवर टिकणाऱ्या नाहीत, असे निरीक्षण न्यायमूर्ती मिलिंद फडके यांनी नोंदवले.

पत्‍नीने केले होते पतीसह सासरच्‍या मंडळींविरुद्ध गंभीर आरोप

भिंड जिल्‍ह्यातील एका विवाहित महिलेने पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध छळ, हुंडाबळी आणि शारीरिक शोषणाचे आरोप करत तक्रार दाखल केली होती. पतीने आपल्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध लादल्याचा आरोपही केला होता. या तक्रारीवरून पोलिसांनी पतीवर कलम ३७७, ४९८-ए (क्रूरता), ३५४ (विनयभंग) आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले होते. पतीने मध्‍ये प्रदेश उच्‍च न्‍यायालयात धाव घेऊन आपल्यावरील आणि कुटुंबावरील गुन्हे रद्द करण्याची विनंती केली होती.

Section 377 Marital Ruling | पती-पत्नीमधील 'अनैसर्गिक' संबंध हा गुन्हा ठरत नाही; हायकोर्टाचा निकाल
supreme court | 'पत्नी म्हणजे मोलकरीण नव्हे, पतीनेही घरकामात, स्वयंपाकात मदत करायला हवी' : सर्वोच्च न्यायालय

... कलम ३७७ नुसार, पतीला स्वतंत्रपणे गुन्हेगार ठरवता येणार नाही

न्यायालयाने नमूद केले की, २०१३ च्या कायद्यातील दुरुस्तीनंतर 'बलात्कारा'च्या व्याख्येत अनेक शारीरिक कृत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी वैवाहिक संबंधात पती आणि पत्‍नीमध्‍ये जे कृत्ये 'अनैसर्गिक' समजली जायची, ती आता कलम ३७५ अंतर्गत येतात. मात्र कलम ३७५ मधील 'अपवाद २' नुसार, जर पत्नी सज्ञान असेल, तर पतीने तिच्याशी ठेवलेले शारीरिक संबंध हे बलात्काराच्या व्याख्येत मोडत नाहीत.वैवाहिक नात्यात ही कृत्ये कायद्याने अपवाद ठरवण्यात आल्यामुळे, त्यांना पुन्हा कलम ३७७ (अनैसर्गिक कृत्य) खाली स्वतंत्रपणे गुन्हेगार ठरवता येणार नाही, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले.

Section 377 Marital Ruling | पती-पत्नीमधील 'अनैसर्गिक' संबंध हा गुन्हा ठरत नाही; हायकोर्टाचा निकाल
Marital Cruelty |"महिला सहन करतात म्हणून तक्रारीस उशीर होतो" : वैवाहिक छळ प्रकरणी हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

पतीवर लावलेले 'कलम ३७७' अंतर्गत असलेले आरोप रद्द

न्यायालयाने या प्रकरणातील पतीवर लावलेले 'कलम ३७७' अंतर्गत असलेले आरोप रद्द केले आहेत. तसेच, नणंदेविरुद्धचे आरोप अस्पष्ट असल्याने तिच्यावरील कायदेशीर कारवाईही थांबवली आहे. मात्र, पती, सासरा आणि सासू यांच्यावरील हुंडा छळ, मारहाण आणि धमकी (कलम ४९८-ए, ५०६) यांसारखे इतर गंभीर आरोप रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिला. हुंडाबळी आणि शारीरिक छळाच्या संदर्भात सुरुवातीचे ठोस पुरावे दिसून येत आहेत, त्यामुळे या आरोपांची सुनावणी कनिष्ठ न्यायालयात सुरू राहील," असेही उच्‍च न्यायालयाने स्पष्ट केले.

Section 377 Marital Ruling | पती-पत्नीमधील 'अनैसर्गिक' संबंध हा गुन्हा ठरत नाही; हायकोर्टाचा निकाल
Live In Relationship HC: सज्ञान महिलेशी विवाहित पुरूषाचे लिव्ह इन रिलेशनशिप गुन्हा ठरत नाही; HC ने नोंदवले महत्वाचे निरीक्षण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news