Marital Cruelty |"महिला सहन करतात म्हणून तक्रारीस उशीर होतो" : वैवाहिक छळ प्रकरणी हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

पतीविरुद्धचा गुन्हा फेटाळल्‍यास नकार, कनिष्ठ न्यायालयाचा निकाल ठेवला कायम
Marital Cruelty |"महिला सहन करतात म्हणून तक्रारीस उशीर होतो" : वैवाहिक छळ प्रकरणी हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
Published on
Updated on

Kerala High Court on Marital Cruelty Case

कोची : "वैवाहिक जीवनातील क्रूरता आणि छळ हा एक 'सतत चालणारा गुन्हा' आहे, कारण पीडितेचे दुःख एखाद्या एकाकी घटनेने संपत नाही. त्यामुळे केवळ तक्रार नोंदवण्यास विलंब झाला, या तांत्रिक कारणास्तव पतीविरुद्धचा गुन्हा फेटाळला जाऊ शकत नाही. फिर्यादीची बाजू विश्वासार्ह असेल तर केवळ उशिरा केलेली तक्रार त्या प्रकरणाची विश्वासार्हता कमी करू शकत नाही," असा महत्त्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.

कनिष्ठ न्यायालयाच्या निकालास पतीने दिले होते हायकोर्टात आव्हान

'लाईव्‍ह लॉ'च्‍या रिपोर्टनुसार, पतीने पती आणि सासूवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप होता. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने पतीला दोषी ठरवले. त्याला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पतीने असा युक्तिवाद केला होता की, पत्नीने तक्रार नोंदवण्यास खूप विलंब केला आणि साक्षीदारांच्या जबाबांत तफावत आहे.

Marital Cruelty |"महिला सहन करतात म्हणून तक्रारीस उशीर होतो" : वैवाहिक छळ प्रकरणी हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
dating app case |सहमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना ब्रेकअपनंतर गुन्हेगारी स्वरूप देणे चुकीचे : हायकोर्ट

कलम ४९८-अ अंतर्गत होणार छळ विशिष्‍ट काळापुरता मर्यादित नसतो

न्यायमूर्ती एम.बी. स्नेहलता यांनी स्पष्ट केले की, भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८-अ (Section 498A) अंतर्गत होणारा छळ हा एका विशिष्ट काळापुरता मर्यादित नसून, जोपर्यंत जाचाची वागणूक सुरू असते, तोपर्यंत तो गुन्हा सुरूच असतो.

Marital Cruelty |"महिला सहन करतात म्हणून तक्रारीस उशीर होतो" : वैवाहिक छळ प्रकरणी हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
National Flag insult case | राष्ट्रध्वजाचा अपमान ठरण्यासाठी 'अपमानाचा हेतू' महत्त्वाचा : हायकोर्ट

तक्रारीला विलंब का होतो?

पीडित महिला तक्रार करण्यास विलंब का करतात? याची न्यायमूर्ती एम.बी. स्नेहलता यांनी निकालात नमूद केलेली कारणे खालीलप्रमाणे...

  • अनेकदा महिला आपला संसार टिकेल आणि पतीमध्ये सुधारणा होईल या आशेने छळ सहन करतात.

  • कुटुंबाकडून अनेकदा 'जुळवून घेण्याचा' किंवा सामाजिक प्रतिष्ठेसाठी गप्प राहण्याचा दबाव असतो.

  • पतीविरुद्ध पोलिसांत जाणे हा समाजात आजही कलंक मानला जातो.

  • स्वतःचे आणि मुलांचे भवितव्य तसेच आर्थिक गरजांमुळे महिला कायदेशीर पाऊल उचलण्यास घाबरतात.

Marital Cruelty |"महिला सहन करतात म्हणून तक्रारीस उशीर होतो" : वैवाहिक छळ प्रकरणी हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
Caste Identity | "धर्मांतर केले असो किंवा आंतरजातीय विवाह, व्यक्तीची जात बदलत नाही" : हायकोर्ट

... तर ४९८-अ चा मूळ उद्देशच धोक्यात येईल

उच्च न्यायालयाने पतीचा युक्तिवाद फेटाळून लावताना सांगितले की, वैवाहिक छळाच्या प्रकरणांमध्ये अति-तांत्रिक दृष्टिकोन ठेवल्यास कलम ४९८-अ चा मूळ उद्देशच धोक्यात येईल. पत्नीने दिलेल्या पुराव्यानुसार, गरोदर असतानाही तिला मारहाण करण्यात आली होती, ज्याला वैद्यकीय प्रमाणपत्राने पुष्टी दिली होती. न्यायालयाने पतीची गुन्हेगारी सिद्ध ठरवणारा निकाल कायम ठेवला. मात्र, प्रकरणाची परिस्थिती पाहून त्याची एक वर्षाची शिक्षा कमी करून ती सहा महिने इतकी केली आहे. "हुंड्यासाठी पत्नीला मारहाण करणे हा केवळ घरगुती वाद नसून, तो लोभ आणि लिंगाधारित हिंसेतून उद्भवलेला गंभीर गुन्हा आहे," असेही न्यायालयाने नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news