Uttarakhand Helicopter Missing: जोशीमठाच्या डोंगरात हेलिकॉप्टर बेपत्ता! पायलटसह 6 जणांचा शोध सुरू; नेमकं काय घडलं?

Uttarakhand Helicopter Missing: उत्तराखंडमधील जोशीमठजवळ बद्रीनाथहून निघालेल्या हेलिकॉप्टरचा संपर्क अचानक तुटल्याने खळबळ उडाली आहे.
Uttarakhand Helicopter Missing
Uttarakhand Helicopter MissingPudhari
Published on: 
Updated on: 

Uttarakhand Helicopter Missing: उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात बद्रीनाथहून फाटाकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा संपर्क अचानक तुटल्याने खळबळ उडाली आहे. जोशीमठजवळील चायी गाव परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप हेलिकॉप्टरचे अवशेष सापडलेले नाहीत. लष्कर, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर ट्रान्स भारत एव्हिएशन कंपनीचे आहे. हेलिकॉप्टरचे लोकेशन अचानक गायब झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. खराब हवामानामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी आणखी दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत.

हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सहा जण होते

उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाने (UCADA) दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये पायलट कॅप्टन हिमांशू यांच्यासह एकूण सहा जण प्रवास करत होते. प्रवाशांच्या यादीत प्रतापा, अरुण, शंकर गौडा, सुधीर के. आणि एच. एस. नटराज या पाच जणांची नावे आहेत.

ट्रान्स भारत एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे VT-HCX हे हेलिकॉप्टर बद्रीनाथहून डेहराडूनमधील सहस्रधारा येथे जाण्यासाठी रवाना झाले होते. दुपारी साधारण १ वाजून १४ मिनिटांनी हेलिकॉप्टरने उड्डाण केले. जोशीमठ खोऱ्यावरून जात असताना त्याचा संपर्क तुटला. त्यानंतर ट्रॅकिंग यंत्रणेवरही हेलिकॉप्टरचे लोकेशन दिसेनासे झाले.

पाऊस आणि दाट धुक्यामुळे शोधकार्यात अडथळे

हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची माहिती मिळालेल्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच आकाशात दाट ढग असल्याने दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे बचावकार्य करणाऱ्या पथकांना हेलिकॉप्टरचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत.

सध्या बद्रीनाथ आणि जोशीमठदरम्यानच्या डोंगराळ भागात शोधमोहीम राबवली जात आहे. भारतीय लष्कर, चमोली जिल्हा प्रशासन आणि एसडीआरएफची पथके या मोहिमेत सहभागी झाली आहेत. हेलिकॉप्टरचे अवशेष शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Uttarakhand Helicopter Missing
Mumbai Crime: मुंबईतील प्रसिद्ध मॉडेलविरोधात १.३९ कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल; व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचा आरोप

लष्कर, एसडीआरएफ आणि पोलिसांची पथके तैनात

जोशीमठचे उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर वशिष्ठ यांनी हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले.

परिसरात काही संशयास्पद वस्तू दिसल्याने हेलिकॉप्टर कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लष्कर, एसडीआरएफ, पोलीस आणि आरोग्य विभागाची पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. उपविभागीय अधिकारी स्वतःही घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून बचावकार्याचा आढावा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे. चायी गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

Uttarakhand Helicopter Missing
Mirzapur The Movie OTT Release: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर 'मिर्झापूर' आता OTT वर! पण यावेळी चाहत्यांना काय खास पाहायला मिळणार?

जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि एसडीआरएफच्या माध्यमातून बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण घटनेवर आपण लक्ष ठेवून असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

हेलिकॉप्टरमधील कोणी गंभीर जखमी आढळल्यास त्यांना तातडीने एअर लिफ्ट करून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सर्व प्रवासी सुखरूप असावेत, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून ट्रान्स भारत एव्हिएशन कंपनीच्या संपूर्ण हेलिकॉप्टर ताफ्याचे उड्डाण तात्पुरते थांबवण्यात आले आहे.

ऑक्टोबरमध्येही दोन हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग

चारधाम यात्रेदरम्यान ऑक्टोबर महिन्यातही हेलिकॉप्टरच्या दोन आपत्कालीन लँडिंगच्या घटना घडल्या होत्या. यातील एका घटनेत रुद्रप्रयाग येथे खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. तर दुसऱ्या घटनेत टिहरी येथे तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.