Mirzapur The Movie OTT Release: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर 'मिर्झापूर' आता OTT वर! पण यावेळी चाहत्यांना काय खास पाहायला मिळणार?

Mirzapur The Movie OTT Release: 'मिर्झापूर: द मूव्ही' हा बहुचर्चित चित्रपट 30 ऑक्टोबर 2026 पासून Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला आहे.
Mirzapur The Movie OTT Release
Mirzapur The Movie OTT ReleasePudhari
Published on: 
Updated on: 

Mirzapur The Movie OTT Release: 'मिर्झापूर' या लोकप्रिय क्राइम थ्रिलर वेब सीरिजचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून 'मिर्झापूर: द मूव्ही'च्या ओटीटी रिलीजची वाट पाहत होते. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. ही बहुचर्चित फिल्म आता ओटीटीवर दाखल झाली आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या ओटीटी व्हर्जनमध्ये प्रेक्षकांना काही अतिरिक्त सिनही पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

'मिर्झापूर: द मूव्ही' कुठे पाहता येणार?

पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदू शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'मिर्झापूर: द मूव्ही' आता Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. 30 ऑक्टोबर 2026 पासून हा चित्रपट उपलब्ध झाला आहे.

प्राइम व्हिडिओनेही सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या रिलीजची अधिकृत घोषणा केली. 'भौकाल आ चुका है. मिर्झापूर: द मूव्ही को प्राइम पर देखें,' अशा शब्दांत प्लॅटफॉर्मने चाहत्यांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाचा मोठा धमाका

'मिर्झापूर: द मूव्ही'ने थिएटरमध्येही चांगली कमाई केली होती. ट्रेड ट्रॅकर Sacnilk च्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 30.90 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी 38.40 कोटी, तर तिसऱ्या दिवशी 43.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

पहिल्या आठवड्यात चित्रपटाची एकूण कमाई 148.45 कोटी रुपयांवर पोहोचली होती. तर जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनचा आकडा 339.84 कोटी रुपये होता. या कमाईमुळे चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

Mirzapur The Movie OTT Release
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण! आता खरेदी करावी की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?

चित्रपटात कोणते कलाकार आहेत?

गुरमीत सिंह यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी कालीन भैय्याची भूमिका साकारली आहे. तर अली फजल आणि दिव्येंदू शर्मा हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. याशिवाय रवि किशन, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगावकर, अभिषेक बॅनर्जी, हर्षिता गौर, राजेश तैलंग, शीबा चड्ढा आणि सोनल चौहान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

काय आहे 'मिर्झापूर: द मूव्ही'ची कथा?

या चित्रपटाची कथा 'मिर्झापूर' वेब सीरिजच्या पहिल्या सीझनच्या काळातील आहे. म्हणजेच, ही कथा वेब सीरिजमधील घटनांनंतरची नसून त्याच काळात घडणाऱ्या घडामोडींवर आधारित आहे.

Mirzapur The Movie OTT Release
Navnath Ban: '12 पक्ष फिरलेली माकडछाप व्यक्ती...', नवनाथ बन यांची धंगेकरांवर बोचरी टीका

चित्रपटात कालीन भैय्या आणि त्याच्या गुन्हेगारी साम्राज्याभोवती फिरणारी सत्तेची लढाई दाखवण्यात आली आहे. जैसलमेरमधील बबन यादव नावाचा ड्रग्ज माफिया मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ घेऊन पळून जातो. त्यामुळे मिर्झापूरमधील गुन्हेगारी साम्राज्याचे गणित बिघडते.

या घटनेनंतर कालीन भैय्यावर आपला अवैध ड्रग्ज व्यवसाय वाढवण्याचा दबाव निर्माण होतो. परिस्थिती अधिकच गंभीर होत जाते आणि त्याच्या जवळच्या माणसांनाही या संघर्षात उतरावे लागते. सत्ता, पैसा आणि गुन्हेगारीच्या या खेळात पुढे काय घडते, हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.