Trimbakeshwar Helicopter | त्र्यंबकेश्वरसाठी खासगी हेलिकॉप्टर सेवा; भाविकांना मिळणार सशूल्क हवाई दर्शन पॅकेज

Trimbakeshwar Helicopter | नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे हेलिपोर्ट सुविधा विकसित करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
Helicopter
HelicopterPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे हेलिपोर्ट सुविधा विकसित करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे तीन हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. या सुविधेचा भविष्यातही वापर करण्याचे नियोजन आहे.

Helicopter
Nashik Smart City | नाशिक स्मार्ट सिटीच्या 4.23 कोटींच्या अखर्चित निधीवरून केंद्र व राज्य शासनाचा जाब

खासगी विमानसेवा आणि हेलिकॉप्टर ऑपरेटरच्या सहभागातून भाविकांना सशूल्क दर्शन पॅकेज उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव काही ऑपरेटर्सला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्र्यंबकेश्वर येथे उभारण्यात आलेल्या तीन हेलिपॅडमुळे एकाच वेळी तीन हेलिकॉप्टर येण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते.

या सुविधेचा उपयोग केवळ मान्यवरांच्या दौऱ्यापुरता मर्यादित न ठेवता, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांची वाहतूक सुलभ करण्यासाठी करण्याचा विचार आहे. यासाठी खासगी हवाई सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांशी संलग्नता प्रस्थापित करून हेलिकॉप्टरद्वारे भाविकांना त्र्यंबकेश्वर येथे आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

या प्रस्तावित सेवेत हेलिकॉप्टर प्रवासासोबत सशूल्क दर्शन पॅकेज उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. हेलिपोर्टपासून त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कुशावर्त तीर्थापर्यंत भाविकांना पोहोचवण्यासाठी स्थानिक टॅक्सीचालकांशी समन्वय साधून वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याचाही प्रस्ताव आहे.

त्यामुळे भाविकांचा प्रवास अधिक सुलभ होण्यासह टॅक्सी व्यावसायिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात ही सुविधा सुरू करण्याचे नियोजन आहे. भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यास कुंभमेळ्यानंतरही सेवा सुरू ठेवण्याचा विचार आहे. सद्यःस्थितीत खासगी हेलिकॉप्टर ऑपरेटरकडून या प्रस्तावाला प्रतिसाद मिळाल्यास २ नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Helicopter
Godavari River Pollution | गोदावरी नदी प्रदूषणप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे नाशिक मनपा आयुक्तांना कडक निर्देश

राज्यातून ४० ते ५० मिनिटांत त्र्यंबकेश्वर

२ नोव्हेंबरपासून हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असून मुंबई, नवी मुंबई, पुणे, सुरत, जळगाव, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर येथून ४० ते ५० मिनिटांत प्रवास करून त्र्यंबकेश्वरला पोहोचणे शक्य असलेल्या शहरांतून ही सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे. या माध्यमातून सहा किंवा आठ प्रवाशांच्या क्षमतेचे हेलिकॉप्टर भाविकांना सेवा देणार आहे.

त्याचप्रमाणे हेलिपॅडपासून मंदिरापर्यंत स्थानिक वाहनांची व्यवस्था करण्याचे नियोजन, संपूर्ण हवाई प्रवास, दर्शन आणि स्थानिक वाहतूक व दर्शनासाठी सुमारे अडीच हजारांच्या प्रवेशपत्रासह भाविकांना पॅकेज देऊन चार तासांत त्र्यंबकेश्वर दर्शन सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव खासगी ऑपरेटर्सला देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news