पुढारी ऑनलाईन डेस्क : गुगल वापरकर्त्यांना नेहमी नवीन फिचर देत असते. आता गुगल मॅप मध्ये नवे फिचर आणले आहे. गुगल मॅप स्पीड लिमिट फंक्शन वापरकर्त्यांना ते ज्या रस्त्यावर आहेत. त्याची गती, मर्यादा दाखवते आणि जर ते ओलांडत असतील तर त्यांना सूचना देते.
गुगल मॅप वापरकर्ते चालवत असलेल्या मोटारीचा वेग दाखवतात. पण वापरकर्त्यांना कारचे स्पीडमीटरवर आपले स्पीड पहायला सांगतात. अॅपमध्ये स्पीडमीटर फक्त सूचनात्मक उपयोगासाठी आहे. आणि वापरकर्त्यांनी त्यावर अवलंबून राहू नये.
गुगल मॅप्सने पहिल्यांदा २०१९ मध्ये स्पीडोमीटर सुरु केले होते. त्यानंतर ते आशिया, युरोप, दक्षिण अमेरिका, यूके आणि यूएस मधील निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले होते. पुढे ऑन-स्क्रीन स्पीडोमीटर जगभरातील अधिक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले. याशिवाय, गुगल वापरकर्त्यांची गती, मर्यादा दाखवते.
गुगल मॅपची गती, मर्यादा नकाशाच्या खाली डाव्या कोपऱ्यात, बारच्या वर प्रवास कालावधी, ETA, उर्वरित किलोमीटर आणि नेव्हिगेशन बंद करण्यासाठी आणि संपूर्ण मार्ग दाखवण्याचे पर्याय दाखवले आहे.
गुगल मॅप सुरु करा.
वरती उजव्या कोपऱ्यात, प्रोफाइल फोटोवर क्लिक करा.
सेटींग वरती जावा.
नेव्हीगेशन सेटींग पर्यंत स्क्रोल करा.
हे सुरु करण्यासाठी स्पीड लिमिट सेटींग वरती जावा. यावरती जाऊन स्पीड लिमिट सुरु करा. हे सुरु होईल आणि वेळोवेळी तुम्हाला सूचना देईल.
वापरकर्त्यांनी ते चालवत असलेल्या रस्त्यावर वेग मर्यादा ओलांडल्यास त्यांना गुगल मॅपद्वारे सूचना केली जाईल.