सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर | पुढारी

सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात सलग सातव्या दिवशी,रविवारी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिले.सर्वसामान्यांना त्यामुळे दिलासा मिळाला.यापूर्वी ५ सप्टेंबर रोजी इंधन दरवाढ झाली होती. त्यावेळी इंधन दर १५ पैशांनी घटले होते. देशाची राजधानी दिल्लीमध्ये रविवारी एक लिटर पेट्रोलची किंमत १०१.१९ रुपये आणि डिझेलची किंमत ८८.६२ रुपये प्रति लीटर पर्यंत पोहोचली आहे.
तर, मुंबईमध्ये पेट्रोल १०७.२६ रुपये आणि डिझेल ९६.१९ रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले, तरी राज्यातील स्थानिक करांवर दर अवलंबून असल्याने इंधनाचे किरकोळ दर वेगळे आहेत. आतापर्यंत सप्टेंबर महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दोन वेळा कपात करण्यात आली.
महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच १ सप्टेंबर रोजी भारतीय बाजारातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दोन्हीच्या किंमतीत प्रत्येकी १५ पैसे प्रति लिटरने कपात केली होती. त्याचवेळी, सलग ३ दिवस स्थिर राहिल्यानंतर ५ सप्टेंबर रोजी पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा प्रत्येकी १५ पैशांनी प्रति लिटर कमी झाले. अशाप्रकारे एका आठवड्यात पेट्रोल-डिझेलचे दर प्रत्येकी ३० पैशांनी स्वस्त झाले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती परकीय चलन दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किंमतीनुसार दररोज अद्ययावत केल्या जातात. तेल विपणन कंपन्यांकडून दरांचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित केली जाते.

Back to top button