पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. विजय रुपाणी यांनी काल (ता. ११) राजीनामा दिल्यानंतर नव्या विधीमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी आज आमदारांची बैठक बोलविण्यात आली होती.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याकडे लक्ष लागले होते.
मनसुख मांडविया यांच्यासह अन्य नेत्यांची नावे चर्चे होती मात्र, अनपेक्षितपणे भूपेंद्र पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुढील वर्षी डिसेंबर 2022 मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत,
त्याआधी विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे ही पक्षासाठी पॅचअप मोहीम असल्याचे बोलले जात आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका भूपेंद्र पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून भाजपसमोर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे आव्हान असेल.
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी चंद्रकांत पाटील, नितीन पटेल, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला यांची नावे चर्चेत होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांची निवड केली आहे.
हेही वाचा :