Dharmendra Pradhan Parliament Welcome: पायउतार झालेल्या प्रधानांची संसदेत हिरोसारखी एन्ट्री; भाजप खासदारांनी केले जंगी स्वागत

Dharmendra Pradhan Parliament Welcome
Dharmendra Pradhan Parliament Welcomepudhari
Published on
Updated on

Dharmendra Pradhan Parliament Welcome: कॉक्रोज जनता पार्टीने नीट पेपर लीग प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडल. मंत्रीपद सोडल्यानंतर पहिल्यांदाच धर्मेंद्र प्रधान हे संसदेत पोहचले होते. त्यावेळी संसद भवनच्या गेटवर भाजप आणि एनडीएच्या इतर खासदारांनी धर्मेंद्र प्रधान यांचे जंगी स्वागत केलं.

Dharmendra Pradhan Parliament Welcome
Dharmendra Pradhan: पेपरफुटीविरोधात पोलिसांचा मार खाल्ला, आज त्याच मुद्द्यावरून राजीनामा दिला; धर्मेंद्र प्रधानांची कहाणी

यावेळी भाजप आणि सत्ताधारी एनडीएच्या खासदारांनी धर्मेंद्र प्रधान जिंदाबाद अशा घोषणा देखील दिल्या. त्यानंतर त्यांना पाग घालून संसदेत नेण्यात आलं. विरोधी पक्ष प्रधानांचा राजीनामा हे सरकारचा पराभव असं चित्र निर्माण करत असताना सत्ताधारी मात्र त्याला एका त्यागाचे स्वरूप देत आहेत. जनतेच्या रेट्याचा आपण सन्मान केला असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Dharmendra Pradhan Parliament Welcome
Dharmendra Pradhan resignation: विद्यार्थ्यांसमोर सरकार झुकलं; अखेर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

पंतप्रधानांनी माफी मागावी

काँग्रेसने पेपर लीग प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत चर्चा करण्यात येणार नाही अशी भूमिका घेतली होती. शनिवारी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर विरोधीपक्षाने आपली रणनिती बदलत विद्यार्थांवर केलेल्या लाठीचार्जवरून सरकारला घेरायला सुरूवात केली आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवर कथित हल्ल्यासाठी पोलिसांना कारवाईचे आदेश कोणी दिले होते असे विचारणा करणारे पत्र गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे. राहुल गांधी यांनी या लाठीचार्जबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

Dharmendra Pradhan Parliament Welcome
Dharmendra Pradhan Daughter: धर्मेंद्र प्रधानानंतर आता त्यांची मुलगी नैमिषा Gen Z च्या रडावर; परदेशी डिग्री थेट निशाण्यावर

बिहारमध्ये AK-47 चा वापर?

राहुल गांधी यांनी बिहारमधील विद्यार्थी आंदोलनाबाबतची एक न्यूज आपल्या एक्सवर शेअर करून म्हणाले की, पूर्ण सिस्टमच जीवघेणी आहे. त्यांनी बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर एके ४७ मधून गोळ्या झाल्याच्या आणि शेकडो विद्यार्थ्यांना अटक केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे असं सांगितलं.

पॅलेट गनवरून रणकंदन

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारला विचारलं की, 'तुम्ही विद्यार्थ्यांवर कोणता गुन्हा दाखल होणार नाही त्यांना सोडण्यात येईल असं वचन दिलं होतं. कुठं गेलं हे वचन. दिल्लीत विद्यार्थ्यांवर पॅलेट गन आणि बिहारमध्ये एके ४७ चा वापर करण्यात आला.

गांधी पुढे म्हणाले की, 'राहुल गांधी म्हणाले की, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार किंवा दिल्ली. प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारची पावले उचलली गेली. सरकार खोटारडे असून रिफॉर्म करणे त्यांना जमणार नाही. सरकार आपल्या आश्वासनावरून मागे हटत आहे. ते सगळ्या मार्गांनी विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news