Dharmendra Pradhan Daughter: धर्मेंद्र प्रधानानंतर आता त्यांची मुलगी नैमिषा Gen Z च्या रडावर; परदेशी डिग्री थेट निशाण्यावर

Dharmendra Pradhan Daughter
Dharmendra Pradhan DaughterPudhari
Published on
Updated on

Dharmendra Pradhan Daughter: जंतर मंतरवर कॉक्रोज जनता पार्टीचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरूद्ध आंदोलन सुरू आहे. नीट पेपर घोटाळा प्रकरणी त्यांनी राजीनामा द्वावा अशी मागणी आंकोलकांनी केली आहे. मात्र धर्मेंद्र प्रधान हे माझा राजीनामा मागणे हा राजकारणाचा भाग आहे असं म्हणत अजूनपर्यंत राजीनामा देण्याचं टाळलं आहे.

Dharmendra Pradhan Daughter
Rahul Gandhi: CJP आंदोलन सोडून राहुल गांधी अचानक PM निवासस्थानी का गेले? यामागचं राजकारण काय होतं?

कॉक्रोज जनता पार्टीच्या संसद मोर्चावेळी लाठीचार्ज अन् असभ्य वर्तन झाल्यामुळं त्याला वेगळं वळण लागलं. आता gen z ने आपला मोर्चा धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीकडे म्हणजे नैमिषा प्रधान यांच्याकडे वळवला आहे. त्यांना मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. शेवटी त्यांना आपले इन्स्टाग्राम अकाऊंट डिसेबल करावं लागलं आहे. आंदोलकांनी प्रधानांचा राजीनामा मागितल्यानंतर आता त्यांच्या मुलीच्या परदेशातील शिक्षणावरून टार्गेट केले जात आहे.

Dharmendra Pradhan Daughter
CJP Protest Delhi: CJP संसद मोर्चाप्रकरणी मोठी कारवाई! 10 FIR दाखल; दिल्लीत सुरक्षा वाढली, बंगालमधून 2 हजार CRPF जवान रवाना

नैमिषा प्रधान यांनी २०२३ मध्ये अमेरिकेच्या मॅसाचुसेट्स मधील टफ्ट्स विद्यापीठातून फ्लेचर स्कूल ऑफ लॉ अँड डिप्लोमसी मधून मास्टर्सची डिग्री घेतली आहे. त्या सध्या अमेरिका इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरममध्ये एक वरिष्ठ असोसिएट म्हणून काम करत आहेत.

Dharmendra Pradhan Daughter
CJP Jantar Mantar Protest: २० जुलै तर ट्रेलर... सरकारनं ऐकलं नाही तर 'शांत' बसणार नाही; CJP प्रवक्ता रांका यांनी दिला इशारा

इन्स्टाग्राम युजर्सच्या टार्गेटवर टफ्ट्स विद्यापीठ देखील आलं. युजर्सनी टफ्ट्स विद्यापीठाच्या अनेक सोशल मीडिाय पोस्टवर कमेंट करत धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अशा कमेंट टाकल्या. त्याचबरोबर त्यांनी नैमिषाला सस्पेंड करण्याची देखील मागणी केली. ट्रलर्सनी नैमिषाला टार्गेट करत आपली शिक्षण व्यवस्था फेल झाली आहे तुम्हाला माहिती आहे म्हणूनच तुम्ही परदेशात शिकत आहात.

सोशल मीडियावर या वादात कुटुंबातील व्यक्तींना ओढण्यास विरोध केला आहे. सत्तेत बसलेल्या लोकांचे उत्तरादायीत्व निश्चित झाले पाहिजे. मात्र त्याचा फटका त्यांच्या मुलांना बसू नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news