Delhi Police Facial Recognition Flaw: फेशियल रिकग्निशन वरून दिल्ली पोलीस तोंडघशी? २८३७ कथित गुन्हेगारांपैकी २५ आरोपी होते जेलमध्येच

Delhi Police Facial Recognition Flaw
Delhi Police Facial Recognition Flawpudhari
Published on
Updated on

Delhi Police Facial Recognition Flaw: मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने जंतर मंतर झालेल्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भातील सर्व एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर सरकारला गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या त्या २८३७ लोकांविरूद्ध कारवाई करण्याची देखील परवानगी दिली होती.

Delhi Police Facial Recognition Flaw
Delhi Police X notice : आंदोलनादरम्यानच्या 'त्या' आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ तत्काळ हटवा; दिल्ली पोलिसांची 'X'ला नोटीस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व आरोपी २० ते २६ जुलै दरम्यान जंतर मंतरवर उपस्थित होते आणि त्यांची फेशियल रेकग्निशन सॉफ्टवेअरद्वारे ओळख पटली आहे. मात्र यातील २५ आरोपी तर जेलमध्येच होते. दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं की कोणतीही कारवाई ही फक्त फेशियल रिकग्निशनच्या आधारावर नाही तर फिल्ड व्हेरिफिकेशनद्वारे केली जाणार आहे. दिल्ली पोलिसांसमोर आता एक मोठे आव्हान असणार आहे.

Delhi Police Facial Recognition Flaw
Delhi High Court On Police Force: आम्हाला यात ओढू नका... दिल्ली उच्च न्यायालयाने हात झटकले, 'बळाचा' वापर प्रकरणी त्वरित सुनावणी नाहीच

हत्या, हत्येचा प्रयत्न, बलात्कार, बाल शोषण अशा गंभीर आरोप असलेल्या गुन्हेगारांच्या तपासात समोर आलं की जंतर मंतरवर फेशियल रिकग्निशन सिस्टमद्वारे ओळख पटवण्यात आलेल्या २८३७ कथित गुन्हेगारांच्या यादीतील २५ लोक असे आहेत जे जेल आणि कोर्टाच्या रेकॉर्डनुसार ते जेलमध्ये बंद होते.

पोलिसांच्या यादीत जे २८७३ नावांचा समावेश आहे. द इंडियन एक्सप्रेसने याबाबत तपास केला होता. या यादीत असे गुन्हेगार देखील आहेत ज्यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, दुष्कर्म केल्याचे आरोप आहेत. अशा गुन्हेगारांची संख्या ही २०५ होती त्यातील १०१ खून, ६१ दुष्कर्म, ६ पॉक्सो, ६२ मधील ३७ आरोपींचा हत्येचा प्रयत्न आणि दुष्कर्म या सारख्या गुन्ह्यात समावेश आहे.

Delhi Police Facial Recognition Flaw
Serial Killer Arrested Delhi Police | ’त्या’ सिरीयल किलरला २५ वर्षांनी अटक: टॅक्सी चालकांना मारुन मृतदेह फेकून द्यायचा

तिहार, मंडोली आणि रोहिणी मधील १७ आरोपी

दिल्ली पोलीसांच्या रेकॉर्डनुसार २०५ लोकांमधील १७ आरोपी असे आहेत की ज्यांच्यावर हत्येचे आरोप आहेत. ४ आरोपींवर दुष्कर्म केल्याचे आरोप होते. त्यालीत २ आरोपींवर पोस्को खाली कारवाई करण्यात आली होती. तर इतर ४ अन्य जणांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हे नोंद आहेत. रेकॉर्डनुसार ज्यावेळी एफआरएस (फेस रेकग्निशन सॉफ्टवेअर) ने जंतर मंतर वर या लोकांची ओळख पटवली होती त्यावेळी ते दिल्लीच्या तीन जेलमध्ये तिहार, मंडोली आणि रोहिणीमध्ये बंद होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news