Delhi High Court On Police Force: आम्हाला यात ओढू नका... दिल्ली उच्च न्यायालयाने हात झटकले, 'बळाचा' वापर प्रकरणी त्वरित सुनावणी नाहीच

Delhi High Court On Police Force
Delhi High Court On Police ForcePudhari
Published on
Updated on

Delhi High Court On Police Force: दिल्ली पोलिसांनी कॉक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनावेळी अतिरिक्त बळाचा वापर केला या विरूद्ध याचिका दाखल झाली असून दिल्ली उच्च न्यायालयाने या याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्यास नकार दिला. सोमवारी संसदेवरील मार्चवेळी दिल्ली पोलीसांनी अतिरिक्त बळाचा वापर केल्याचा दावा करण्यात आला आहे.

या याचिकेबाबत बोलताना दिल्ली उच्च न्यायालयाचे जस्टिस डी.के. उपाध्याय आणि जस्टिस तेजस करिया यांनी याचिकाकर्त्यांना आम्हाला याच्यात ओढू नका असं सांगितलं. दरम्यान, या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

Delhi High Court On Police Force
Salman Khan Moves Delhi High Court | 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी' विरोधात सलमान खान उच्च न्यायालयात! टीजरसह प्रदर्शन थांबवण्याची मागणी

याचिकाकर्त्यांनी या बेंचला त्वरित सुनावणी घेण्याची विनंती केली होती. त्यांनी दिल्ली पोलीस आंदोलन दाबण्यासाठी अतिरिक्त बळाचा वापार करत आहेत असं म्हटलं आहे.

आमरण उपोषणावर बसलेल्या सोनम वांगचुक यांना शनिवारी बळजबरीने रूग्णालयात दाखल केल्यानंतर कॉक्रोज जनता पार्टीने आंदोलन सुरू केलं. सोनम वांगचुक हे २१ दिवस उपाषणावर होते. सोनम वांगचुक आणि कॉक्रोज जनता पार्टीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा नीट पेपर लीक प्रकरणी राजीनामा मागितला आहे.

Delhi High Court On Police Force
Delhi High Court | केजरीवालांच्‍या न्यायालयीन कामकाजाचे व्हिडिओ हटवा : दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा आदेश

या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर जवळपास १७८ लोकं जखमी झाले आहेत. यात आंदोलक तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. या हिंसाचारात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ११८ पोलीस जखमी झाले आहेत.

पोलिसांकडून, 'नियम मोडणारे, आक्रमक आणि हिंसक वृत्तीच्या हिंसक जमावाने हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. या धुमश्चक्रीत ६० आंदोलक देखील जखमी झाले आहेत.' अशी माहिती देण्यात आली.

Delhi High Court On Police Force
Pizza Buttermilk Delhi High Court: मुलांना पिझ्झा पार्टी द्‍या : हायकोर्टाने ठेवली अनोखी अट, नेमकं प्रकरण काय?

सीजेपी प्रवक्त्यांनी, 'भारतीय लोकशाहीच्या इतिहासात हा सर्वात लाजीरवाणा दिवस आहे. विद्यार्थी एका गंभीर विषयासाठी इथं आपल्या मागण्या घेऊन आले आहेत. त्यांना दिल्ली पोलीस क्रूरतेनं मारत आहे.' दरम्यान, कॉक्रोज जनता पार्टीने जोपर्यंत ते शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत आपलं आदोलन थांबवणार नाहीत असं जाहीर केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news