Delhi Police X notice : आंदोलनादरम्यानच्या 'त्या' आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ तत्काळ हटवा; दिल्ली पोलिसांची 'X'ला नोटीस

युझरची माहितीही मागितली, संबंधित पोस्‍ट, व्‍हिडिओमधील सर्व डेटा सुरक्षित करण्‍याचे निर्देश
Delhi Police X notice
Delhi Police X notice Pudhari
Published on
Updated on

Delhi Police X notice : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर (पूर्वीचे ट्विटर) देशातील घटनात्मक प्रमुखांना लक्ष्य करणारा "आक्षेपार्ह, द्वेषयुक्त आणि अवमानकारक मजकूर" प्रसारित केला जात असल्याच्या तक्रारीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 'X' प्रशासनाला पत्र लिहिले आहे. पोलिसांनी 'X' ला संबंधित वादग्रस्त पोस्ट अथवा व्हिडिओ त्वरित प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

'X' वरील युझरची माहितीही मागितली

खातेदाराच्या खात्यावरून संबंधित वादग्रस्‍त मजकूर पोस्ट करण्यात आला आहे, त्या युझरचे पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी यांसह नोंदणीचा संपूर्ण तपशील देण्यास सांगितले आहे. याशिवाय, तपासाला गती मिळावी यादृष्टीने वेळ आणि तारखेच्या नोंदींसह (Time and date stamps) त्या खात्याचे 'लॉगिन' आणि 'लॉगआउट' तपशील व इतर आवश्यक माहिती पुरवण्याची मागणीही पोलिसांनी केली आहे.

संबंधित पोस्‍ट, व्‍हिडिओमधील सर्व डेटा सुरक्षित करण्‍याचे निर्देश

संबंधित पोस्ट किंवा व्हिडिओशी निगडित सर्व डेटा भविष्यातील तपासासाठी सुरक्षित (Preserve) ठेवण्याचे निर्देश प्लॅटफॉर्मला देण्यात आले असून, भारतीय साक्ष अधिनियम (BSA) च्या कलम ६३(४) अंतर्गत प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

Delhi Police X notice
Mumbai Protest: जंतर-मंतर लाठीमाराविरुध्द मुंबईत मोर्चे; शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची तिरंगा रॅली

यापूर्वी दिले होते PM मोदींच्‍या विरोधातील व्‍हिडिओ हटवण्‍याचे आदेश

यापूर्वी, २७ जुलै रोजी जंतर-मंतर येथील विद्यार्थ्यांची निदर्शने आणि २० जुलैच्या 'संसद चलो' मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्द व आक्षेपार्ह वक्तव्ये असलेले व्हिडिओ आणि पोस्ट्स हटवण्याचे निर्देश दिदिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानीत झालेल्या आंदोलनादरम्यान आणि त्यानंतरच्या घडामोडींमध्ये पंतप्रधानांविरोधात अर्वाच्च भाषा वापरलेल्या अनेक पोस्ट्स सोशल मीडियावर पसरल्या होत्या. दिल्ली पोलिसांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना दिले होते.

Delhi Police X notice
Satyam Pandit: जंतर-मंतरवरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदुत्ववादी नेत्याची मारहाण; वादग्रस्त सत्यम पंडित आहे तरी कोण?

'एक्‍स'ने अनेक आक्षेपार्ह पोस्‍ट आणि व्‍हिडिओ हटवले

NEET परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात विद्यार्थ्यांनी २० जुलै रोजी जंतर-मंतरवरून संसदेच्या दिशेने काढलेल्या 'चलो संसद' मोर्चादरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांशी चकमक झाली होती. या घटनेमुळे निर्माण झालेल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई समोर आली आहे. पोलिसांनी बजावलेल्या नोटिसांनंतर अनेक आक्षेपार्ह टिप्पण्या आणि व्हिडिओ यापूर्वीच हटवण्यात आले आहेत.नियमभंग करणाऱ्या मजकुरावर कठोर कारवाई करण्यासाठी सायबर आणि सोशल मीडिया टीम्स ऑनलाइन हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news