Serial Killer Arrested Delhi Police | ’त्या’ सिरीयल किलरला २५ वर्षांनी अटक: टॅक्सी चालकांना मारुन मृतदेह फेकून द्यायचा

दिल्‍ली पोलिसांनी केली अटक : नेपाळमध्ये राहीला होता लपून : चार टॅक्‍सीचालकांची हत्‍या केल्‍याचे उघड
Serial Killer Arrested Delhi Police
प्रातिनिधीक छायाचित्र Canva Image
Published on
Updated on

'That' serial killer arrested after 25 years: Used to kill taxi drivers and dump bodies

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने २५ वर्षे जुन्या प्रकरणातील अजय लांबा नामक एका सिरीयल किलरला अटक केली आहे. तो २५ वर्षांपासून फरार होता. अजय लांबा टॅक्सी बुक करायचा, त्यानंतर तो उत्तराखंडला घेऊन जायचा आणि तिथे चालकाची हत्या करून मृतदेह डोंगरावरून एका खड्ड्यात फेकून द्यायचा. त्याने त्याच्या साथीदारांसह चार टॅक्सी चालकांची हत्या केली होती.

Serial Killer Arrested Delhi Police
Serial Killer Dr. Death: 27 खून करून मगरींना मृतदेह खायला घालणारा सिरियल किलर; पॅरोलवर सुटला, आश्रमात पुजारी म्हणून लपला...

दरम्यान, २००१ पासून सिरीयल किलर्सची ही टोळी वेगवेगळे गुन्हे करत होती. दिल्लीत टॅक्सी चालकांच्या बेपत्ता होण्याचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. या चालकांच्या बेपत्ता होण्यात याच टोळीचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

अजय लांबाच्या बाबत पोलिसांच्या तपासात असे दिसून आले की, हे लोक प्रथम दिल्लीहून भाड्याने वाहने बुक करायचे, नंतर त्यांना उत्तराखंडला घेऊन जायचे. त्यांना नशा करून बेशुद्ध करायचे. त्यानंतर चालकांचा गळा दाबून खून करायचे.

नंतर मृतदेह अल्मोडा, हल्द्वानी आणि उधमसिंग नगर सारख्या भागातील खोल भागात फेकून द्यायचे. जेणेकरून मृतदेह कोणीही मिळवू शकला नाही. त्यानंतर हे लोक गाडी घेऊन नेपाळमध्ये विकायचे. या प्रकरणात चार चालकांच्या हत्येची पुष्टी झाली आहे. यात पोलिसांनी फक्त एकाच चालकाचा मृतदेह मिळू शकला, इतर तीन चालकांचे मृतदेहही सापडले नाहीत.

Serial Killer Arrested Delhi Police
serial killer : देवमाणूस सिरीयल प्रमाणे या माथेफिरुने केली चार तरुणींची हत्या

१० वर्षे नेपाळमध्ये हाेता लपून 

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अजय लांबा १० वर्षे नेपाळमध्ये लपून बसला होता. अजयने तिथे एका मुलीशी लग्नही केले. अजय पूर्वी या टोळीतील इतर सदस्य धीरेंद्र आणि दिलीप पांडे यांना आधीच अटक करण्यात आली आहे. एक आरोपी धीरज अजूनही फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news