Delhi Red Fort Blast: कुठे तयार होत होते स्लीपर सेल? डॉक्टर–मौलवींची भूमिका काय? तपासात धक्कादायक माहिती समोर

Red Fort Blast Investigation: दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणाच्या तपासात डॉक्टर आणि मौलवींच्या स्लीपर सेल नेटवर्कचा उलगडा झाला आहे.
Delhi Red Fort Blast
Delhi Red Fort BlastPudhari
Published on
Updated on

Delhi Blast Sleeper Cell Doctors Cleric NIA Investigation

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. या तपासात समोर आलेल्या माहितीमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान समोर आलं की काही डॉक्टर आणि मौलवी मिळून ‘स्लीपर सेल’ नेटवर्क चालवत होते. या प्रकरणाचे धागेदोरे फरीदाबाद–दिल्ली मॉड्यूल आणि जम्मू–काश्मीरमधील रुग्णालयांशी जोडले गेल्याचं तपास यंत्रणांना आढळलं आहे.

पुढील तपास NIA करणार

लाल किल्ला स्फोटाच्या तपासाची जबाबदारी आता राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडे देण्यात आली आहे. NIA च्या पथकांनी देशातील अनेक राज्यांत छापे टाकले असून, तपासाचा फोकस आता मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल नेटवर्कवर आहे.

डॉक्टरांच्या लॉकरमधून AK-47 जप्त

जम्मू–काश्मीरमधील GMC अनंतनाग येथील डॉक्टरच्या लॉकरमधून AK-47 रायफल सापडल्याने सुरक्षा यंत्रणांच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेनंतर काश्मीरमधील सर्व मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मौलवीकडून विद्यार्थ्यांचे ब्रेनवॉश

तपासात उघड झालं आहे की इरफान नावाचा मौलवी, जो पूर्वी GMC श्रीनगरमध्ये पॅरामेडिकल स्टाफ आणि इमाम म्हणून काम करत होता, त्याने काही मेडिकल विद्यार्थ्यांचे ब्रेनवॉश केले आहे.
या विद्यार्थ्यांचा संबंध जैश-ए-मोहम्मद (JeM) संघटनेच्या विचारधारेशी जोडला गेला असून, इरफान आणि तीन डॉक्टरांनी मिळून फरीदाबाद-दिल्ली मॉड्यूल तयार केल्याची शक्यता तपासात समोर आली आहे.

फरीदाबाद पोलिसांच्या क्राईम ब्रांचने अल-फलाह विद्यापीठातील तीन डॉक्टरांची सखोल चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी दिल्ली स्फोट प्रकरणाशी आणि त्यातील संशयित डॉक्टर–मौलवी नेटवर्कशी संबंधित आहे.

Delhi Red Fort Blast
Delhi Blast: दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही; भूतानमधून PM मोदींनी ठणकावलं

कार, मृतदेह आणि नवी ओळख

स्फोटात वापरलेली i20 कार 29 ऑक्टोबरला नव्या मालकाने घेतल्याचं समोर आलं आहे.
या कारचा PUC प्रमाणपत्र देखील त्याच दिवशी काढण्यात आल होतं, ज्यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. दरम्यान, एका मृत व्यक्तीचा शव झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने तपासात नवा ट्विस्ट आला आहे. स्फोटाच्या तीव्रतेमुळे तो हवेत उडून दूर फेकला गेला होता. NIA च्या सूत्रांच्या माहितीनुसार, एका मृतदेहाची ओळख शरीरावरील टॅटूंमुळे (Mom, Dad, Kriti) पटली असून, तो व्यक्ती अमर कटारिया असल्याचं निश्चित झालं आहे.

Delhi Red Fort Blast
Delhi Blast: दिल्ली स्फोटातील संशयित डॉ. उमर मोहम्मद कोण? पहिला फोटो आणि व्हिडिओ आला समोर, पुलवामा कनेक्शन उघड

जम्मू–काश्मीर पोलिसांनी डॉ. सज्जाद अहमद यांना ताब्यात घेतलं असून, त्यांची चौकशी सुरू आहे. स्फोटातील मृतांचा आकडा आता 10 वर पोहोचला असून, 25 जखमी LNJP रुग्णालयात उपचार घेत आहेत. स्फोटानंतर देशभरातील रेल्वे स्थानकांवर आणि संवेदनशील ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. RPF आणि GRP पथके संयुक्तरीत्या अँटी-सॅबोटाज तपासणी करत आहेत.

गृहमंत्रालयाची बैठक

दिल्लीतील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गृहमंत्रालय आणि तपास यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक दुपारी 3 वाजता बोलावण्यात आली होती. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्फोटातील पीडित कुटुंबीयांना मदतीचं आश्वासन दिलं. त्या म्हणाल्या, “ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. सरकार सर्व पीडितांच्या पाठीशी आहे आणि कुणालाही अडचण येऊ दिली जाणार नाही.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news