Delhi Blast History: लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट; जाणून घ्या, दिल्ली किती वेळा हादरली...

Blast History of the Capital: राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट झाला असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटानंतर कार आणि जवळच्या गाड्यांना आग लागली. या घटनेनंतर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मुंबईत हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
Delhi Blast History
Delhi Blast HistoryPudhari
Published on
Updated on

Delhi Red Fort Blast History Capital Explosion: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट झाला आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका कारमध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर कारला आग लागली आणि जवळच उभ्या असलेल्या एक-दोन गाड्यांनाही आग लागली. हा स्फोट बॉम्बस्फोट होता की सीएनजी टँकचा स्फोट हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुरक्षा यंत्रणा तपास करत आहेत. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत.

दिल्लीमध्ये कधी स्फोट झाले आहेत?

  • 25 मे 1996 : लाजपत नगर सेंट्रल मार्केटमध्ये बॉम्बस्फोट - 16 जणांचा मृत्यू.

  • 1 ऑक्टोबर 1997 : सदर बाजारजवळ दोन बॉम्बस्फोट - 30 जण जखमी.

  • 10 ऑक्टोबर 1997 : शांतीवन, कौडिया पुल आणि किंग्जवे कॅम्प परिसरात तीन स्फोट - एक ठार, 16 जखमी.

  • 18 ऑक्टोबर 1997 : राणी बाग मार्केटमध्ये दुहेरी स्फोट - एक ठार, 23 जखमी.

  • 26 ऑक्टोबर 1997 : करोल बाग मार्केटमध्ये दोन स्फोट - एक ठार, 34 जखमी.

  • 30 नोव्हेंबर 1997 : लाल किल्ला परिसरात दुहेरी स्फोट - तीन ठार, 70 जखमी.

  • 30 डिसेंबर 1997 : पंजाबी बागजवळ बसमध्ये स्फोट - चार ठार, 30 जखमी.

  • 18 जून 2000 : लाल किल्ल्याजवळ दोन स्फोट - दोन ठार, 12 जखमी.

  • 16 मार्च 2000 : सदर बाजारात स्फोट - सात जखमी.

  • 27 फेब्रुवारी 2000 : पहाडगंजमध्ये स्फोट - आठ जखमी.

  • 14 एप्रिल 2006 : जामा मशिदीत दोन स्फोट - 14 जखमी.

  • 22 मे 2005 : लिबर्टी आणि सत्यम सिनेमागृहात दोन स्फोट - 1 ठार, 60 जखमी.

  • 29 ऑक्टोबर 2005 : सरोजिनी नगर, पहाडगंज आणि गोविंदपुरी येथे दोन स्फोट - अंदाजे 59-62 जण ठार, 100+ जण जखमी.

  • 13 सप्टेंबर 2008 : करोल बाग (गफ्फार मार्केट), कनॉट प्लेस आणि ग्रेटर कैलास-1 येथे पाच स्फोट - 20-30 जण ठार, 90+ जण जखमी.

  • 27 सप्टेंबर 2008 : मेहरौली फ्लॉवर मार्केट (सराई) येथे स्फोट - 3 ठार, 23 जखमी.

  • 25 मे 2011 : दिल्ली उच्च न्यायालयाच्या पार्किंगमध्ये स्फोट - कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Delhi Blast History
Delhi Blast Video: दिल्ली हादरली! लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट; काही क्षणांत गाड्या जळून खाक, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

हे असे स्फोट आहेत ज्यांनी एकेकाळी राजधानी दिल्ली हादरली होती. अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमी झाले. दरम्यान, आजच्या स्फोटामुळे दिल्लीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा स्फोट लाल किल्ल्यापासून फक्त 500 मीटर अंतरावर झाला, जो वर्दळीचा परिसर आहे.

मुंबईत हाय अलर्ट

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे आणि 24 जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे दिल्लीत भीती पसरली आहे. उत्तर प्रदेश आणि मुंबईत हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी एनसीआरमधील नोएडा आणि गाझियाबाद या जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि एनसीआरमध्ये वाहन तपासणीचे आदेशही दिले आहेत.

Delhi Blast History
Delhi Redfort Blast: संध्याकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी कार सिग्नलवर थांबली अन्....; दिल्ली पोलिसांनी घटनाक्रम सांगितला

वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, स्फोटात अनेक पार्क केलेल्या वाहनांना धडक बसली आहे. अहवालात असे म्हटले आहे की सुमारे आठ वाहनांचे नुकसान झाले आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना जवळच्या लोक नायक जय प्रकाश रुग्णालयात (एलएनजेपी) दाखल करण्यात आले आहे. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाची टीम पोहोचली होती.

सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे

स्फोटाचे कारण तपासले जात आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. फॉरेन्सिक टीमही तपास करत आहे. स्फोटानंतर दिल्ली पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. संसद भवन, ऐतिहासिक इमारती आणि सरकारी कार्यालयांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, दहशतवादी हल्ल्यांचा तपास करणारी संस्था एनआयएची एक टीमही घटनास्थळी पोहोचली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news