Delhi Blast: दिल्ली स्फोटातील संशयित डॉ. उमर मोहम्मद कोण? पहिला फोटो आणि व्हिडिओ आला समोर, पुलवामा कनेक्शन उघड

Delhi Red Fort Blast: लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात संशयित ठरलेला डॉ. उमर मोहम्मद हा पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं तपासात उघड झालं आहे.
Who Is Dr Umar Mohammad
Who Is Dr Umar MohammadPudhari
Published on
Updated on

Delhi Red Fort Blast Dr Umar Mohammad Pulwama Connection: राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाबाबत नवे तपशील समोर आले आहेत. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, संशयित सुसाईड बॉम्बर डॉ. उमर मोहम्मद स्फोट होण्यापूर्वी तब्बल तीन तास एका पार्किंगमध्ये कारमध्येच बसून होता. त्याने या काळात गाडीबाहेर एक क्षणही पाऊल टाकले नाही.

तीन तास कारमध्येच बसला होता

CCTV फुटेजनुसार, हुंडई i20 कार (नंबर HR 26CE 7674) दुपारी 3:19 वाजता लाल किल्ल्याजवळील पार्किंगमध्ये आली आणि सुमारे 6:30 वाजता तिथून निघाली. म्हणजे जवळपास तीन तास उमर या गाडीतच बसून होता. तो कोणाची वाट पाहत होता की कोणत्यातरी आदेशाची वाट पाहत होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

6:52 वाजता दिल्ली हादरली

संध्याकाळी 6:52 वाजता लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ स्फोट झाला. काही क्षणांतच परिसरात भीषण गोंधळ झाला. अनेक वाहने जळून खाक झाली आणि नऊ जणांचा मृत्यू झाला. जखमींना लोकनायक जयप्रकाश (LNJP) रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कारची मालकी

पोलिसांनी स्फोटात वापरलेल्या i20 कारचा मागोवा घेतला असता -

  • कारचा मूळ मालक मोहम्मद सलमान याला पोलिसांनी अटक केली आहे.

  • सलमानने ही कार देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली होती.

  • देवेंद्रने ती पुढे आमिर नावाच्या व्यक्तीला विकली.

  • आमिरने ही गाडी तारिक (जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी) याला दिली.

  • तारिकने अखेर ही कार डॉ. उमर मोहम्मद याला विकली.

सध्या आमिर आणि तारिक या दोघांची पोलिस चौकशी करत आहेत.

Who Is Dr Umar Mohammad
Delhi Blast Video: दिल्ली हादरली! लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट; काही क्षणांत गाड्या जळून खाक, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा दुसरा धागा हरियाणाच्या फरीदाबाद येथे सापडलेल्या 2,900 किलो स्फोटकांशी जोडला गेला आहे. या स्फोटापूर्वीच सुरक्षा दलांनी फरीदाबादमध्ये ही मोठी स्फोटके जप्त केली होती आणि त्या प्रकरणी दोन संशयित डॉ. मुझम्मिल शकील आणि डॉ. आदिल राथर, यांना अटक केली होती.

Who Is Dr Umar Mohammad
Delhi Blast History: लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट; जाणून घ्या, दिल्ली किती वेळा हादरली...

तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, या स्फोटात अमोनियम नायट्रेट वापरले गेले होते. हेच स्फोटक फरीदाबादमध्येही जप्त झाले होते. उमरने आणखी दोन साथीदारांसह हा स्फोट घडवण्याची योजना आखली होती आणि गाडीत आधीपासूनच डेटोनेटर बसवण्यात आला होता.

दोन डॉक्टरांना अटक, तिसरा डॉक्टर उमर नबी फरार

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट फरीदाबादमध्ये एक दिवस आधी उघडकीस आलेल्या ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘अन्सार गझवत-उल-हिंद’ या दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित असण्याची शक्यता आहे.

स्फोटापूर्वी काही दिवस, जम्मू-काश्मीर पोलिसांनी हरियाणातील फरीदाबाद आणि उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे दोन डॉक्टरांना अटक केली होती, ज्यांचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय आहे.
या डॉक्टरांची नावे आहेत —

  • डॉ. मुझम्मिल अहमद गणाई (पुलवामा)

  • डॉ. आदिल मजीद राथर (काझीगुंड)

गणाई फरीदाबादमधील अल फलाह हॉस्पिटलमध्ये कार्यरत होता. पोलिसांनी त्याच्या फरीदाबादमधील धौज गावातील घरातून तब्बल 358 किलो अमोनियम नायट्रेटसारखं स्फोटक पदार्थ जप्त केलं.

डॉ. उमर नबी स्फोटात सामील असण्याची शक्यता

पोलिसांच्या तपासानुसार, या गटातील तिसरा डॉक्टर उमर नबी, जो गणाईच्या अटकेनंतर बेपत्ता झाला होता, तोच लाल किल्ला स्फोटात सामील असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. CCTV फुटेजमध्ये दिसणाऱ्या हुंडई i20 कारमधील व्यक्ती म्हणून उमर नबीच ओळखला गेला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

उमर नबी हा पुलवामातील कोइल गावचा रहिवासी असून अल फलाह युनिव्हर्सिटीच्या मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत होता. गणाईच्या अटकेनंतर त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न केले.

पुलवामात पोलिसांची छापेमारी

पोलिसांनी सोमवारी रात्रीपासून पुलवामातील विविध गावांमध्ये पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यात आमिर राशिद या संभुरा गावातील व्यक्तीचा समावेश असून, तोच स्फोटक कारचा मालक असल्याचा संशय आहे. पोलिसांनी त्याच्या भावालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आणखी तीन स्थानिक युवकांनाही चौकशीसाठी नेण्यात आले आहे.

जैश मॉड्यूलमध्ये चार डॉक्टरांचा समावेश

पोलिसांच्या माहितीनुसार, या जैश मॉड्यूलमध्ये किमान चार डॉक्टर सामील होते —

  1. डॉ. मुझम्मिल गणाई

  2. डॉ. आदिल मजीद राथर

  3. डॉ. उमर नबी

  4. आणि लखनौतील एक महिला डॉक्टर, तिलाही आता चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

या दहशतवादी नेटवर्कचा उलगडा श्रीनगरच्या बाहेरील भागात लागलेल्या ‘जैश-ए-मोहम्मद’च्या पोस्टर्सनंतर सुरू झालेल्या तपासादरम्यान झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news