CRPF Pellet Gun Report: CJP आंदोलनात पॅलेट गन वापरण्यास मंजुरी होती? CRPFच्या अहवालाने उडाली खळबळ

CRPF Pellet Gun Report: दिल्लीतील CJP आंदोलनादरम्यान पॅलेट गन वापरण्यास RAF ला अधिकृत मंजुरी होती, असा दावा CRPF च्या अहवालात करण्यात आला आहे.
CRPF Pellet Gun Report
CRPF Pellet Gun ReportPudhari
Published on
Updated on

CRPF Pellet Gun Report: NEET प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलन आणि त्यानंतरच्या संसद मार्चदरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला होता. या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी पॅलेट गनचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेत तीन आंदोलक गंभीर जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. दिल्ली पोलिसांनी मात्र पॅलेट गन वापरल्याचा आरोप फेटाळला होता. आता केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) अहवालामुळे या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.

RAF ला पॅलेट गन वापरण्याची परवानगी होती

CRPF च्या अहवालानुसार, आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) ला पंप अॅक्शन गन, म्हणजेच पॅलेट गन वापरण्याची अधिकृत मंजुरी देण्यात आली होती. ही कारवाई करताना सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्यात आल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

पॅलेट गनचा वापर शेवटचा पर्याय

अहवालानुसार, 20 जुलै रोजी संसद मार्चदरम्यान परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतरच पॅलेट गन वापरण्यात आली. त्याआधी आंदोलकांना सार्वजनिक इशारा देण्यात आला, त्यानंतर अश्रुधूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आणि लाठीचार्जही करण्यात आला. हे सर्व उपाय निष्फळ ठरल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंजुरीने पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

CRPF Pellet Gun Report
India US Tariff: भारतावर लागणार 100 टक्के टॅरिफ? अमेरिकेच्या नवीन विधेयकामुळे टेन्शन वाढलं; पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार

तीन आंदोलक जखमी, 47 RAF जवानही जखमी

या कारवाईत पॅलेट गनमुळे तीन ते पाच आंदोलक जखमी झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दुसरीकडे, आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक संघर्षात RAF चे 47 जवान जखमी झाले असून त्यापैकी सहा जवानांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

CRPF Pellet Gun Report
Supreme Court: CJP आंदोलनावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! अटक थांबवा, ताब्यातील आंदोलनकर्त्यांना तातडीने सोडा

सर्वोच्च न्यायालयात मांडणार भूमिका

या प्रकरणावर CRPF चे महासंचालक जी. पी. सिंह यांनी सार्वजनिक भाष्य करण्यास नकार दिला. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने CRPF दलाची अधिकृत भूमिका न्यायालयासमोरच मांडली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news