CJP Split : 'कॉकरोच जनता पार्टी'मध्ये फूट; मनीष ब्रह्मभट्ट यांच्याकडून 'CJP-D' या नव्या गटाची घोषणा

अभिजीत दीपके यांनी पक्षाला केजरीवालांची 'बी-टीम' बनवल्याचा आरोप; मूळ कार्यकर्त्यांना डावलल्याचा दावा
Cockroach Janata Party split
मनीष ब्रह्मभट्ट Pudhari
Published on
Updated on

Cockroach Janata Party split : सध्या चर्चेत असलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) मध्ये फूट पडली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर हुकूमशाही आणि मूळ कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप करत माजी कार्यकर्ते मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'कॉकरोच जनता पार्टी-डेमोक्रॅटिक' (CJP-D) या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. दीपके यांनी या तरुणांच्या आंदोलनाला अरविंद केजरीवालांची 'हँड-पिक्ड टीम' बनवले असल्याचा गंभीर आरोपही ब्रह्मभट्ट यांनी केला आहे.

अभिजीत दीपके यांनी पक्षाला केजरीवालांची 'बी-टीम'

दिल्लीत गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना मनीष ब्रह्मभट्ट यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. ते म्हणाले, "लोकांच्या घाम आणि रक्तावर उभारलेले हे आंदोलन आता केवळ आम आदमी पार्टी (AAP) आणि अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय हितासाठी वापरले जात आहे. विद्यार्थ्यांचे आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात आता या पक्षाला रस उरलेला नाही. हा पक्ष फक्त केजरीवाल यांच्या सांगण्यावरून भाजपविरोधी राजकारण करत आहे." पक्षाच्या कोअर कमिटीतील ८ सदस्यांचे थेट 'आप'शी संबंध असल्याचा दावाही त्यांनी केला.

Cockroach Janata Party split
Jaipur Government School CJP: ज्या शाळेसाठी CJP च्या नेत्यांनी मार खाल्ला... तीच शाळा आता झाली जमीनदोस्त

महाराष्ट्रात झाले होते तीव्र आंदोलन

यापूर्वी ऑगस्ट महिन्यात मनीष ब्रह्मभट्ट आणि राहुल पांड्या यांनी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे अभिजीत दीपके यांच्या घराबाहेर तीव्र निदर्शने केली होती. जंतर-मंतरवरील आंदोलनात सक्रिय असणाऱ्या मूळ कार्यकर्त्यांना बाजूला सारून मर्जीतील लोकांची 'राष्ट्रीय कार्यकारिणी' निवडल्याचा त्यांचा आरोप होता. या आंदोलनादरम्यान प्रकृती बिघडल्याने दोघांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

Cockroach Janata Party split
CJP Delhi March: कॉकरोच जनता पार्टीचा मोठा निर्णय! 5 सप्टेंबरचा दिल्ली मार्च अचानक मागे; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

अल्‍पावधीत 'CJP'चे मोठ्या व्यासपीठात रुपांतर

सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या एका टिप्पणीनंतर १६ मे रोजी अभिजीत दीपके यांनी उपरोधिक स्वरूपात 'CJP' ची सुरुवात केली होती. हळूहळू या सोशल मीडिया मोहिमेचे रूपांतर तरुण, परीक्षांचे पेपर लीक होणे आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या मोठ्या व्यासपीठात झाले.

Cockroach Janata Party split
Abhijit Dipke Leaves AAP For Money: पैशाच्या कारणामुळं अभिजीत दिपकेंनी सोडली आप... मुलाखतीत CJP संस्थापकांनी केले मोठे खुलासे

CJP कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही

दीपके यांनी भूतकाळात 'आप'शी असलेले संबंध मान्य केले असले तरी, सध्या या पक्षाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनात अरविंद केजरीवाल आणि 'आप'च्या इतर नेत्यांनी सहभाग घेतला होता, ज्यामुळे या दोन्ही संघटनांच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मनीष ब्रह्मभट्ट यांनी केलेल्या या गंभीर आरोपांवर अद्याप अभिजीत दीपके किंवा CJP कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news