Abhijit Dipke Leaves AAP For Money: पैशाच्या कारणामुळं अभिजीत दिपकेंनी सोडली आप... मुलाखतीत CJP संस्थापकांनी केले मोठे खुलासे

Abhijit Dipke Leaves AAP For Money
Abhijit Dipke Leaves AAP For Moneypudhari
Published on
Updated on

Abhijit Dipke Leaves AAP For Money: कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके परदेशात शिकण्यासाठी जाण्यापूर्वी आम आदमी पक्षासोबत काम कर होता हे सर्वांना माहिती आहे. आता अभिजीत दिपके यांनी दावा केला आहे की त्यांना पैसे कमी मिळत असल्याने आपची साथ सोडली आणि शिक्षणासाठी परदेशात गेलो. परदेशातील शिक्षणाचा उद्येश हा जास्त पैसे कमवणे हा होता. दिपकेने असा दावा केल्यानंतर एका नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

Abhijit Dipke Leaves AAP For Money
Abhijit Dipke: भारताचे सर्वात बेस्ट पंतप्रधान कोण? कोणता मुख्यमंत्री आवडतो? अभिजीत दीपकेनं दिलं भन्नाट उत्तर

अभिजीत दिपके २०२० ते २०२३ पर्यंत आप सोबत काम करत होता. अभिजीत यांचे काही व्हिडिओ आणि ट्विट असे आहे ज्याच्यानुसार अभिजीत फक्त ३ वर्षापासून आपशी जोडला गेलेला नव्हता. दिपकेने न्यूज २४ ला एक मुलाखत दिली. त्यावेळी आपचे काम सोडण्याचे कारण पैसा असल्याचं सांगितलं. दिपके हा आपच्या सोशल मीडिया टीमचा एक मेंबर होता.

पैसे कमी मिळत होते म्हणून

आम आदमी पक्षाचे अनेक संस्थापक सदस्य आपला पक्ष मूळ उद्येशापासून भटकत आहे म्हणून पक्ष सोडून गेले. याबाबत दिपकेंना देखील प्रश्न विचारला, तुम्ही देखील आप सोडण्याचं कारण मूळ उद्येशापासून दूर जाणं होतं का असं दिपकेंना विचारण्यात आलं.

त्यावेळी दिपकेंनी थेट उत्तर दिलं. त्यांनी खरं सांगू का मला पैसे कमी मिळत होते. आतापर्यंत तर कसं तरी चालवलं. २० आणि २५ वय असेपर्यंत ठीक आहे मात्र पुढं कुटुंब सांभाळायचंय. जबाबदाऱ्या वाढतील आणि त्यासाठी काहीतरी करावं लागेल. यासाठी सर्वात चांगला रस्ता कोणता होता असा सवाल देखील त्याने विचारला.

Abhijit Dipke Leaves AAP For Money
Abhijit Dipke : शाळा दर्जेदार असतील तरच देश विश्वगुरू होईल

माझे कोणाशी भांडण नाही

अमेरिकेत शिक्षण घेऊन आलेल्या अभिजीतने सांगितलं की, 'बाहेर जाऊन डिग्री घेऊन येईन असा विचार केला होता. मी आम आदमी पक्षातील अनेकांना ओळखतो जे बाहेर जाऊन शिकूण आलेत. मला देखील वाटलं की बाहेर शिक्षणासाठी गेल्यावर मला देखील चांगला जॉब मिळले. थोडे पैसे कमवू शकू. माझे पक्षात कोणाशी भांडण नव्हते. मी वैयक्तिक करणासाटी पक्ष सोडला.'

Abhijit Dipke Leaves AAP For Money
Cockroach Janta Party: देश हादरवणाऱ्या CJP आंदोलनावर येतोय चित्रपट; किती आहे बजेट, अभिजीत दीपकेची भूमिका कोण साकारणार?

अनेक प्रश्न उपस्थित

अभिजीत दिपकेच्या या दाव्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अभिजीत फक्त पैशासाठी आम आदमी पक्षाशी जोडला गेला होता का? २०२० पूर्वी आणि २०२३ नंतर देखील अभिजीत दिपके हा सोशल मीडियावर आम आदमी पक्षाचे आणि अरविंद केजरीवाल यांच्या कामाची स्तुती करताना दिसतो.

जर तुम्ही आम आदमी पक्षासोबत पैशासाठी जोडला गेला होता तर २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत अमेरिकेतून भारतात आलेल्या दिपकेंनी दोन महिने केजरीवाल यांच्यासाठी काम का केलं? आता या प्रश्नाचे उत्तर अभिजीत स्वतःच देऊ शकतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news