CJP Delhi March: कॉकरोच जनता पार्टीचा मोठा निर्णय! 5 सप्टेंबरचा दिल्ली मार्च अचानक मागे; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

CJP September 5 Delhi March: ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर 5 सप्टेंबरचा प्रस्तावित दिल्ली मार्च मागे घेतला आहे.
CJP September 5 Delhi March
CJP September 5 Delhi MarchPudhari
Published on
Updated on

CJP September 5 Delhi March: सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) ने 5 सप्टेंबर रोजी प्रस्तावित केलेला दिल्ली मार्च मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. केंद्र सरकारकडून मिळालेले सकारात्मक आश्वासन आणि न्यायालयाने आज दिलेला आदेश लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

‘कॉकरोच जनता पार्टी’ने यापूर्वी 5 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये मार्च काढण्याची घोषणा केली होती. मात्र, मंगळवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान पक्षाने आपली भूमिका बदलली. CJPचे को-कन्व्हीनर सौरव दास यांनी न्यायालयाला माहिती देताना सांगितले की, केंद्र सरकारकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद, न्यायालयाची प्रतिष्ठा आणि आज पारित झालेला आदेश या सर्व बाबींचा विचार करून मार्चचे आवाहन मागे घेणे योग्य आहे.

सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल यांनीही सरकारची बाजू मांडली. आंदोलकांच्या मनात सरकार आपले आश्वासन पूर्ण करेल की नाही, अशी शंका होती. याच कारणामुळे मार्चची घोषणा करण्यात आली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. आता सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आंदोलकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा सॉलिसिटर जनरल यांनी व्यक्त केली.

CJP September 5 Delhi March
Subhash Chandra : सुभाष चंद्रांना NCLTचा दणका; ६.२५ कोटींच्या 'लोन सेटलमेंट प्लॅन'ला स्थगिती

‘दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिका घेतल्यास प्रश्न सुटेल’

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश (CJI) यांनीही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. दोन्ही बाजूंनी सकारात्मक भावना दाखवली, तर संपूर्ण प्रकरण सहजपणे सोडवता येऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

CJI यांच्या या भूमिकेमुळे सरकार आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ यांच्यातील वाद शांततापूर्ण पद्धतीने सोडवण्याच्या प्रयत्नांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

CJP September 5 Delhi March
AI अ‍ॅपमधून १३ वर्षांच्या मुलीने ३ दिवसांत कमावले २.५ लाख

5 सप्टेंबरचा मार्च आता होणार नाही

सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणि केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ने 5 सप्टेंबरचा प्रस्तावित दिल्ली मार्च मागे घेतला आहे. त्यामुळे 5 सप्टेंबरला होणारे आंदोलन आता होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकार आणि संघटनेदरम्यान झालेल्या या घडामोडीकडे कायदेशीर तसेच सामाजिक पातळीवर सकारात्मक पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news