Internet Breakdown 2025: फक्त एका कारणामुळे जगभरातील लाखो वेबसाइट्स पडल्या बंद; नेमकं काय झालयं?

Internet down worldwide: Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक बंद पडल्या आहेत. Canva, Downdetector, Groww आणि Zerodha सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म्सही या आउटेजमुळे त्रस्त आहेत.
Cloudflare Outage Global Internet
Cloudflare Outage Global InternetPudhari
Published on
Updated on

Cloudflare Outage Global Internet Issue: जगभरातील इंटरनेट युजर्स आज अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्रस्त आहेत. अनेक नामांकित वेबसाइट्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स एकाच वेळी बंद पडल्या असून या मोठ्या आउटेजसाठी कंटेंट सर्व्हिस प्रोव्हायडर Cloudflare जबाबदार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Canva आणि Downdetectorसह अनेक मोठ्या सेवांवर या आउटेजचा परिणाम झाला आहे. अचानक वेबसाइट्स न चालल्याने लाखो युजर्सचे महत्त्वाचे काम थांबले असून सोशल मीडियावर अनेक तक्रारी येत आहे.

Cloudflare Outage Global Internet
Dhurandhar X Review: रणवीर सिंहचं जोरदार कमबॅक; संजय दत्तच्या एन्ट्रीला प्रेक्षकांनी वाजवल्या शिट्ट्या, कसा आहे 'धुरंधर'?

सोशल मीडियावर तक्रार

Cloudflare च्या बिघाडामुळे अनेक ऑनलाइन वेबसाइट्स आणि अ‍ॅप्स बंद झाले आहेत. Groww आणि Zerodha सारख्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सनाही याचा फटका बसला. काही युजर्सना ऑनलाइन पेमेंट्स करतानाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. युजर्सनी X (Twitter) वर प्रतिक्रिया देत विचारलं आहे, अचानक इतक्या सेवा बंद कशा झाल्या?

Cloudflare ने दिले स्पष्टीकरण

कंपनीने सांगितले की तांत्रिक बिघाडाचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे आणि डॅशबोर्ड तसेच API सेवा दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. Cloudflare च्या स्टेटस पेजवरील माहितीनुसार, अनेक ग्राहकांना वेबसाइट आणि डॅशबोर्डवर एरर दिसत होते, ज्यावर आता काम केले जात आहे.

Cloudflare Outage Global Internet
RBI MPC Meet 2025: सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज! होम लोन, कार लोनचा EMI झाला कमी; RBIने घेतला मोठा निर्णय

एका महिन्यात दुसऱ्यांदा Cloudflare चा सर्व्हर फेल

गेल्या महिन्यातही अशाच प्रकारे अचानक अनेक वेबसाइट्स बंद पडल्या होत्या आणि त्यावेळीही Cloudflare च्या सर्व्हर्समध्ये बिघाड झाला होता. Cloudflare अनेक वेबसाइट्सचा कंटेंट होस्ट करतो. त्यामुळे त्याच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला तर जगभरातील लाखो वेबसाइट्स आणि इंटरनेट सेवांवर परिणाम होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news