RBI MPC Meet 2025: सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज! होम लोन, कार लोनचा EMI झाला कमी; RBIने घेतला मोठा निर्णय

RBI Monetary Policy Meeting 2025: रिझर्व्ह बँकेच्या एमपीसी बैठकीत रेपो दरात 0.25% कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यंदा रेपो दरात एकूण 1.25% घट करण्यात आली आहे.
RBI Monetary Policy Meeting 2025
RBI Monetary Policy Meeting 2025Pudhari
Published on
Updated on

RBI Monetary Policy Meeting 2025 Live Updates: आज रिझर्व्ह बँकेच्या एमपीसी बैठकीचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक 3 डिसेंबर रोजी सुरू झाली होती. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ​​आज, 5 डिसेंबर रोजी दोन दिवसांच्या बैठकीचा निकाल जाहीर केला आहे. रेपो दरात 0.25% टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. ही बैठक महागाई, GDP वाढीचा वेग, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.

या वर्षी रेपो दरात चार वेळा कपात करण्यात आली

भारतीय रिझर्व्ह बँकेने 2025 मध्ये चार वेळा रेपो दरात कपात केली आहे. फेब्रुवारीमध्ये आरबीआयने रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली. एप्रिलमध्ये रेपो दरात आणखी 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली आणि जूनमध्ये वर्षातील सर्वात मोठी कपात 50 बेसिस पॉइंट्सची होती. आणि आता, आणखी 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली आहे. एकूण, या वर्षी रेपो दरात 125 बेसिस पॉइंट्स किंवा 1.25 टक्के कपात करण्यात आली आहे.

RBI Monetary Policy Meeting 2025
Year Ender 2025: 2025 मध्ये कुणी मारली बाजी? सोनं, चांदी की शेअर बाजार, कोणी किती दिला परतावा?

रेपो दर म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे तर, रेपो दर म्हणजे व्याजदर ज्यावर आरबीआय व्यावसायिक बँकांना कर्ज देते. जेव्हा बँकांना आरबीआयकडून स्वस्त कर्ज मिळते तेव्हा ते त्यांच्या ग्राहकांसाठी, सामान्य जनतेसाठी कर्जे देखील स्वस्त करतात. याचा सरळ अर्थ असा की जर रेपो दर कमी झाला तर तुमचे होम लोन आणि कार लोनचे ईएमआय कमी होतात. उलट, जर रेपो दर वाढला तर ईएमआयचा भार वाढतो.

शेअर बाजारात जोरदार तेजी

रेपो दर कपातीमुळे शेअर बाजारातही जोरदार तेजी दिसून आली आहे. सेन्सेक्स 200 अंकांपेक्षा जास्त वाढून 85,500 च्या वर व्यवहार करत आहे, तर निफ्टी 75 अंकांनी वाढून 26,110 वर व्यवहार करत आहे. निफ्टी बँकेत 364 अंकांची वाढ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news