Mohammad Junaid: CJP आंदोलनात अन्नदान करणारा मोहम्मद जुनैद थेट सुप्रीम कोर्टात; केली मोठी मागणी, नेमकं प्रकरण काय?

Mohammad Junaid Supreme Court: CJP आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करणारे मोहम्मद जुनैद यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Mohammad Junaid Supreme Court
Mohammad Junaid Supreme CourtPudhari
Published on
Updated on

Mohammad Junaid Supreme Court: दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या CJPच्या (कॉकरोच जनता पार्टी) आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांसाठी अन्न आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारे मोहम्मद जुनैद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत, पोलिसांकडून स्वतःला आणि आपल्या कुटुंबीयांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला असून न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.

याचिकेत काय दावा केला?

याचिकेनुसार, पोलिसांनी जुनैद यांना दिल्लीतून ताब्यात घेतल्यानंतर काही तासांनी हरिद्वारजवळ सोडून दिले. त्या काळात आपल्याला धमकावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, आपल्या वडिलांना आणि बहिणीच्या सासरच्या नातेवाईकांनाही पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचाही आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

कोण आहेत मोहम्मद जुनैद?

मोहम्मद जुनैद हे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील नाहल गावचे रहिवासी आहेत. CJP आंदोलनाच्या सुरुवातीला ते फारसे चर्चेत नव्हते. ते पडद्यामागे राहून आंदोलनात सहभागी झालेल्या युवकांसाठी अन्न आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत होते. मात्र, आंदोलनाच्या अखेरीस त्यांची ओळख 'जुनैद भाई' म्हणून झाली.

CJP मध्ये कोणतेही अधिकृत पद नव्हते

माहितीनुसार, जुनैद यांनी CJP मध्ये कोणतेही अधिकृत पद स्वीकारले नव्हते. त्यांची जबाबदारी आंदोलनस्थळी येणाऱ्या लोकांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था पाहण्यापुरती मर्यादित होती.

Mohammad Junaid Supreme Court
PM Modi Video: फेसबुकने पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओवर घातली बंदी; नंतर घेतला यू-टर्न, नेमकं काय घडलं?

घरावर पोलिसांची कारवाई झाल्याचा दावा

जुनैद यांचे नाव चर्चेत आले, कारण पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन झडती घेतल्याची माहिती समोर आली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी त्यांच्या वडिलांना चौकशीसाठी नेले आणि बँक पासबुक, पॅनकार्डसह काही कागदपत्रे जप्त केली.

Mohammad Junaid Supreme Court
Mohammad Irfan: शाळेत गेला नाही पण संविधान तोंडपाठ; CJPच्या आंदोलनात व्हायरल झालेला इरफान कोण? राहुल गांधींनी घेतली भेट

कुटुंबीयांनी मेरठमधील नातेवाईकांनाही पोलिसांकडून त्रास दिल्याचा आरोप केला आहे. मात्र, मेरठ पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावत, संबंधित नातेवाईकांना ताब्यात घेतल्याची किंवा त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केल्याची माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news