PM Modi Video: फेसबुकने पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओवर घातली बंदी; नंतर घेतला यू-टर्न, नेमकं काय घडलं?

PM Modi Facebook Video: CJP आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवर शेअर केलेला व्हिडिओ काही काळासाठी भारतात मर्यादित करण्यात आला होता.
PM Modi Facebook Video Ban
PM Modi Facebook Video BanPudhari
Published on
Updated on

PM Modi Facebook Video: दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या CJPच्या (कॉकरोच जनता पार्टी) आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना उद्देशून सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, हा व्हिडिओ भारतात फेसबुकवर काही काळासाठी पाहता येत नव्हता. या प्रकारानंतर मेटाने ही कारवाई चुकून झाल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी सेल्फी मोडमध्ये रेकॉर्ड केलेला हा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला होता. काही वेळानंतर तो भारतातील युजर्ससाठी मर्यादित करण्यात आला. व्हिडिओवरील "See Why" पर्यायावर क्लिक केल्यास, कायद्यानुसार हा व्हिडिओ मर्यादित करण्यात आला आहे, असा मेसेज दिसत होता.

PM Modi Facebook Video Ban
Mohammad Irfan: शाळेत गेला नाही पण संविधान तोंडपाठ; CJPच्या आंदोलनात व्हायरल झालेला इरफान कोण? राहुल गांधींनी घेतली भेट

या प्रकरणी माध्यमांनी विचारणा केल्यानंतर मेटाने स्पष्टीकरण देताना हा व्हिडिओ चुकून हटवला किंवा मर्यादित करण्यात आल्याचे सांगितले आणि ती त्रुटी नंतर दुरुस्त करण्यात आल्याचा दावा केला.

आंदोलनाची पार्श्वभूमी

दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP च्या नेतृत्वाखाली अनेक दिवस आंदोलन सुरू होते. आंदोलनकर्त्यांनी तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. 20 जुलै रोजी संसदेकडे मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवल्याची घटना घडली होती.

PM Modi Facebook Video Ban
NEET protest violence: CJP च्या आंदोलनात हत्या, दरोडा आणि बलात्काराचे आरोपी; ९८९ गुन्हेगारांची ओळख पटली, धक्कादायक खुलासा

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी युवकांना उद्देशून व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्या व्हिडिओत त्यांनी पेपर लीकच्या घटनांकडे सरकारने गांभीर्याने पाहिल्याचे सांगत दोषींवर कारवाई करण्यात आल्याचा उल्लेख केला होता.

परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची केली घोषणा

यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आणखी एका व्हिडिओद्वारे परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. या कमिटीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधारित करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news