NEET protest violence: CJP च्या आंदोलनात हत्या, दरोडा आणि बलात्काराचे आरोपी; ९८९ गुन्हेगारांची ओळख पटली, धक्कादायक खुलासा

२० जुलै रोजी आंदोलकांनी संसदेवर काढलेल्या हिंसक आंदोलनामागील सत्य दिल्ली पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
NEET protest violence
NEET protest violencefile photo
Published on
Updated on

NEET protest violence

नवी दिल्ली: 'नीट' परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात आणि शिक्षण पद्धतीत सुधारणांच्या मागणीसाठी २० जुलै रोजी आंदोलकांनी संसदेवर काढलेल्या हिंसक आंदोलनामागील सत्य दिल्ली पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारात खुनाचे आरोप असलेले १०१ जण, दरोडा व लुटालुटीच्या गुन्ह्यांत नोंद झालेले २८४ जण आणि महिला व मुलांवरील लैंगिक अत्याचार व इतर गुन्ह्यांतील ९२ आरोपी सहभागी होते, असे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या बॅनरखाली झालेल्या या आंदोलनादरम्यान, अधूनमधून झालेल्या दगडफेक आणि हिंसाचारामुळे दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे २४० अधिकारी व कर्मचारी गंभीर जखमी झाले होते.

NEET protest violence
CJP protest warning : ‘पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू’; बिहार, बंगालमधील पोलीस कारवाईवर CJPचा केंद्र सरकारला इशारा

२,८७३ आंदोलकांपैकी ९८९ जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी

आंदोलकांकडून होणारी दगडफेक आणि हिंसाचाराची पद्धत पाहून पोलिसांना संशय आला की, बाहेरचे गुन्हेगार आणि समाजकंटक या आंदोलनात घुसले आहेत. या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळी आणि आसपासच्या रस्त्यांवर 'एआय-आधारित फेशियल रेकग्निशन सिस्टम' कॅमेरे बसवले.

या कॅमेऱ्यांद्वारे ओळख पटलेल्या संशयितांची माहिती जेव्हा पोलिसांच्या डेटाबेसशी पडताळून पाहिली गेली, तेव्हा असे आढळले की २,८७३ आंदोलकांपैकी ९८९ जणांची गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी होती. ते केवळ किरकोळ गुन्हेगार नव्हते; त्यापैकी अनेकजण सराईत गुन्हेगार होते आणि त्यांची गुन्हेगारी नोंद आधीपासूनच अस्तित्वात होती.

दिल्ली पोलिसांतील सुत्रांनी दिलेल्या माहितीवरून, जंतर-मंतरवरील हिंसक आंदोलनात केवळ सामान्य विद्यार्थी किंवा आंदोलकच नव्हते, तर एका सुनियोजित कटाचा भाग म्हणून सराईत गुन्हेगारांचा जमाव तिथे जमला होता. FRS तंत्रज्ञानाद्वारे या सर्व व्यक्तींची ओळख पटली आहे. आता ओळख पटलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस मोठ्या प्रमाणावर छापे टाकण्याची तयारी करत आहेत. तपासातील माहितीवरून असे दिसून आले आहे की, आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या समाजकंटकांपैकी मोठ्या संख्येने असे लोक होते जे वारंवार आणि सातत्याने गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतलेले होते.

या यादीत बलात्कार प्रकरणांमधील ६१, विनयभंगाच्या प्रकरणांमधील २५, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेले सहा, शस्त्र कायद्यांतर्गत २२९, जबरीने वस्तू हिसकावण्याच्या प्रकरणांमधील १३५, अपहरणाच्या प्रकरणांमधील १९ आणि अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झालेले ६७ जण यांचा समावेश होता.

हत्येच्या प्रकरणांशी संबंधित १०१ जणांपैकी ४२ जण दोन किंवा त्याहून अधिक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सामील होते, तर १२ जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी १० किंवा त्याहून अधिक प्रकरणांची होती. खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणांतील ६२ आरोपींपैकी २५ जणांवर अनेक गुन्हे दाखल होते.

त्याचप्रमाणे, दरोडा आणि लुटालुटीच्या घटनांशी संबंधित २८४ जणांपैकी १५५ जण दोन किंवा त्याहून अधिक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सामील होते; यामध्ये १० किंवा त्याहून अधिक गुन्हेगारी प्रकरणांची पार्श्वभूमी असलेल्या ३१ जणांचा समावेश होता. बलात्काराच्या आरोपींपैकी आठ जणांवर अनेक गुन्हे दाखल होते. विनयभंग आणि अमली पदार्थ विरोधी कायद्याशी संबंधित गुन्ह्यांमधील आरोपींपैकी अनुक्रमे सहा आणि नऊ जण हे वारंवार गुन्हे करणारे असल्याचे आढळून आले.

NEET protest violence
CJP Agitation : आता तो आमचा नाही, देशाचा झाला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news