Bengaluru: तुरुंग की फाईव्ह स्टार हॉटेल? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरचे व्हिडिओ व्हायरल! कर्नाटकच्या तुरुंगात चालतं तरी काय?

Bengaluru jail news: बंगळूरूच्या अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात सुरक्षेचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.
Bengaluru jail news
Bengaluru jail newsfile photo
Published on
Updated on

Bengaluru jail news

बंगळूरू : बंगळूरूच्या अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात सुरक्षेचे उल्लंघन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुरुंगातील धोकादायक कैदी मोबाईल फोन वापरत असल्याचे आणि टीव्ही पाहत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर तुरुंग प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय?

या व्हायरल क्लिप्समध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी गट ISIS चा कथित भरती करणारा जुहाद हमीद शकील मन्ना आणि सिरीयल रेपिस्ट आणि किलर म्हणून दोषी ठरलेला उमेश रेड्डी हे दोघेही दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फुटेजमध्ये रेड्डी त्याच्या कोठडीत निवांतपणे टीव्हीचा आनंद घेताना दिसत आहे, तर मन्ना तुरुंगाबाहेरील आपल्या साथीदारांशी चक्क मोबाईल फोनद्वारे संपर्क साधत असल्याचे दिसत आहे.

Bengaluru jail news
Crime News: नाल्यात विवस्त्र.., गुप्तांगातून रक्तस्राव... शरीरावर चावल्याच्या खुणा..; ४ वर्षाच्या चिमुकलीसोबत काय घडलं?

तत्काळ चौकशीचे आदेश

या व्हिडिओमुळे कारागृहाच्या सुरक्षेबद्दल आणि कामकाजाबद्दल मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. हे व्हिडिओ कधीचे आहेत, हे स्पष्ट झालेले नसले तरी, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तुरुंग प्रशासनाने तात्काळ अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. "व्हिडिओची सत्यता पडताळल्यानंतर आणि दोषींची ओळख पटल्यानंतर पुढील कठोर कारवाई केली जाईल," अशी माहिती सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.

दरम्यान, सुरक्षा अधिकाऱ्यांनी हे मोबाईल तुरुंगात कसे आले, कोणी दिले, हे व्हिडिओ केव्हा शूट झाले आणि माध्यमांपर्यंत कोणी पोहोचवले याचा शोध सुरू केल्याचे समजते. केंद्रीय तुरुंग अधीक्षकांना परप्पना अग्रहार पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवण्याचे आणि सर्व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, उपमहानिरीक्षक (कारागृह – दक्षिण विभाग) यांना विभागीय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Bengaluru jail news
Jalna Crime News : पाच कोटींच्या ऑनलाईन फसवणुकीतील आरोपी जेरबंद

कर्नाटकच्या तुरुंगातून सुरक्षेची खिल्ली उडवणारे व्हिडिओ!

परप्पना अग्रहारा तुरुंगात सुरक्षा नियमांचे उल्लंघन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, खुनाच्या आरोपाखाली अटकेत असलेला कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याच तुरुंगात सिगारेट आणि कॉफी मग घेऊन बसलेला फोटो व्हायरल झाला होता, ज्यामुळे त्याला व्हीआयपी वागणूक मिळत असल्याचा आरोप झाला होता.

त्याआधी ऑक्टोबरमध्ये, कुख्यात गुंड गुब्बाची सीना याने तुरुंगात केक कापून आणि सफरचंदाची माळ घालून आपला वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओही समोर आला होता. या घटनांमुळे तुरुंगातील ढिसाळ व्यवस्थापन आणि विशिष्ट कैद्यांना मिळणारी विशेष वागणूक पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. वारंवार सुरक्षेची खिल्ली उडवणाऱ्या या व्हिडिओंमुळे कर्नाटकच्या तुरुंगातील धक्कादायक सत्य समोर आले आहे.

Bengaluru jail news
Crime News: तुझ्यासाठी मारले..! पत्नीला भूल देऊन संपवलं अन् ५ प्रेयसींना मेसेज केला, डॉक्टरच्या प्रेमकहाणीने पोलिसही थरकापले!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news