

जालना : गोवा येथील सायबर क्राइममधे जालन्यातील एका जणावर ५ कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी बदनापुर तालुक्यातील गवळवाडी येथील अविष्कार देवीदास सुरडकर यास जालना शहरातील विशाल कॉर्नर परिसरात जेरबंद करण्यात आले.
गोवा सायबर क्राईम येथे ५ कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हा घडल्या पासुन यातील आरोपी हा फरार होता. गुरुवारी गोवा सायबर क्राईम येथील पोलीस व चंदनझिरा पोलीसांनी चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह बाळासाहेब पवार आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले. यावेळी बदनापुर तालुक्यातील गवळवाडी येथील आरोपी अविष्कार देविदास सुरडकर यास विशाल कॉर्नर येथुन ताब्यात घेवुन केलेल्या सायबर क्राईम गुन्ह्या बाबत विचारपुस केली. गोवा सायबर क्राईम पोलिस आरोपीस गोवा येथे घेऊन गेले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चंदनझिराचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांचे नेतृत्वात जमादार कृष्णा तंगे, अशोक जाधव तसेच गोवा सायबर क्राईमचे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास डिकोस्टा, जमादार विराज नर्वेकर, पोलिस कर्मचारी विरेंद्र वाडकर यांनी केली आहे.