

India bank holidays August 2025
नवी दिल्ली: जर तुमचे ऑगस्ट 2025 मध्ये बँकेत काही महत्त्वाचे काम असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑगस्ट महिन्यासाठी बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जाणून घ्या याविषयी...
या महिन्यात स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थी यांसारख्या सणांमुळे देशभरातील विविध राज्यांमध्ये बँका तब्बल ११ दिवसांपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित कामे खोळंबू नयेत, यासाठी सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहूनच तुमच्या कामाचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
ऑगस्ट 2025 मध्ये देशभरात किमान ८ दिवस बँका बंद राहतील. मात्र, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि ओडिशा यांसारख्या राज्यांमध्ये प्रादेशिक सणांमुळे ही संख्या १० ते ११ दिवसांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे ग्राहकांनी बँकेच्या कामाचे नियोजन सुट्ट्यांची ही यादी पाहूनच करावे, जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही.
ऑगस्ट महिन्यात दुसरा व चौथा शनिवार, रविवार, आणि स्वातंत्र्य दिनामुळे सर्व राज्यांमध्ये बँका किमान ८ दिवस बंद राहतील. या सुट्ट्या देशभरात सर्वत्र लागू असतील.
रविवार: ३, १०, १७, २४ आणि ३१ ऑगस्ट
दुसरा शनिवार: ९ ऑगस्ट
चौथा शनिवार: २३ ऑगस्ट
स्वातंत्र्य दिन: १५ ऑगस्ट (शुक्रवार)
देशभरातील निश्चित सुट्ट्यांव्यतिरिक्त, विविध राज्यांमध्ये स्थानिक सण आणि उत्सवांमुळे अतिरिक्त सुट्ट्या असतील. याची सविस्तर यादी खालीलप्रमाणे आहे;
९ ऑगस्ट (शनिवार): रक्षाबंधन (उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरातसह अनेक राज्यांत. हा दुसरा शनिवार असल्याने बँक बंदच राहील.)
१५ ऑगस्ट (शुक्रवार): पारशी नूतन वर्ष (महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या दिवशी स्वातंत्र्य दिनाचीही सुट्टी आहे.)
१६ ऑगस्ट (शनिवार): जन्माष्टमी (गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश)
२६ ऑगस्ट (मंगळवार): हरतालिका तीज / गणेश चतुर्थी (विविध राज्यांत)
२७ ऑगस्ट (बुधवार): गणेश चतुर्थी (महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा)